Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सीसी क्रीम लावता? आता ती क्रीम बनवा घरच्याघरी फक्त १० मिनिटात

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सीसी क्रीम लावता? आता ती क्रीम बनवा घरच्याघरी फक्त १० मिनिटात

चेहरा सुंदर दिसण्यासाठी सीसी क्रीम आवश्यकच. पण ते विकत आणण्यापेक्षा घरीच बनवा फक्त 10 मिनिटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 06:37 PM2022-06-10T18:37:42+5:302022-06-10T18:39:24+5:30

चेहरा सुंदर दिसण्यासाठी सीसी क्रीम आवश्यकच. पण ते विकत आणण्यापेक्षा घरीच बनवा फक्त 10 मिनिटात 

Apply CC cream to make your face glow? Now make that cream at home in just 10 minutes | चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सीसी क्रीम लावता? आता ती क्रीम बनवा घरच्याघरी फक्त १० मिनिटात

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सीसी क्रीम लावता? आता ती क्रीम बनवा घरच्याघरी फक्त १० मिनिटात

Highlightsबाजारात ज्या गुणवत्तेचं आणि परिणामकारकतेचं सीसी क्रीम मिळतं अगदी तसंच सीसी क्रीम तयार करता येतं.

स्वत:ची तयारी करताना आपला लूक छान हवा असं प्रत्येकीलाच वाटतं. लूककडे लक्ष द्यायचं म्हणजे महागडे ब्यूटी प्रोडक्टस हवे आणि तयारी करण्यासाठी हाताशी वेळ हवा. पण कमीत कमी प्रोडक्टसचा वापर करुन परफेक्ट लूकसाठी अवघ्या काही मिनिटात मिनी मेकअप करता येतो. या मिनी मेकअप किटमध्ये सीसी क्रीम हवंच. सीसी क्रीम म्हणजे कलर कंट्रोल क्रीम.जास्त महागडे ब्यूटी प्रोडक्टस न वापरताही चेहरा फ्लाॅलेस, चमकदार आणि छान दिसण्यासाठी सीसी क्रीम वापरलं जातं. पण महागड्या सीसी क्रीमला पर्याय म्हणून अनेकजणी ग्लोनेस येण्यासाठी स्वस्तात मस्त पर्याय म्हणून वेगवेगळे क्रिम्स वापरतात. या क्रिम्समुळे त्वचा खराब होते. त्वचा खराब न होता सुंदर दिसण्यासाठी सीसी क्रीमला पर्याय नाही. पण बाजारातले महागडे सीसी क्रीम वापरण्याला मात्र पर्याय आहे. तो म्हणजे सीसी क्रीम घरी तयार करण्याचा. हे वाचून खरंच  सीसी क्रीम घरी करता येतं असा प्रश्न पडेल? बाजारात ज्या गुणवत्तेचं आणि परिणामकारकतेचं सीसी क्रीम मिळतं अगदी तसंच सीसी क्रीम तयार करता येतं.

Image: Google

सीसी क्रीम घरी कसं करणार?

घरच्याघरी सीसी क्रीम तयार करण्यासाठी फार सामग्रीची गरज नाही. सीसी क्रीम तयार करण्यासाठी 1 चमचा माॅश्चरायझर, 1 चमचा कोरफड जेल, सनस्क्रीन आणि फाउंडेशन थोड्या आणि समप्रमाणात , थोडी काॅम्पॅक्ट पावडर, थोडी लाइट पिंक ब्लश पावडर आणि हे सर्व नीट पेस्ट स्वरुपात एकजीव करण्यासाठी ब्रश एवढ्या सामग्रीची गरज असते.  सीसी क्रीम तयार करताना एका काचेच्या बाउलमध्ये वर सांगितलेली सर्व सामग्री त्या त्या प्रमाणात घेऊन ब्रशनं एकजीव करावी. सीसी क्रीम करताना त्यात अगदी थोड्या प्रमाणात ऑलिव्ह तेलही घालता येतं.

Image: Google

ब्रशनं सर्व सामग्री एकजीव करुन ही पेस्ट एका डब्बीत भरुन ठेवावी. ही क्रीम पुढे काही महिने वापरता येतं.  सीसी क्रीम लावताना चेहरा आधी पाण्यानं स्वच्छ धुवावा. चेहऱ्याला टोनर, माॅश्चरायझर लावावं आणि मग सीसी क्रीम लावावं. सीसी क्रीम लावताना एक ठिपका कपाळावर, एक ठिपका दोन्ही गालांवर, नाकावर, नाकाच्या दोन्ही बाजूने, हनुवटीवर लावून हळूवार हातानं चोळून हे क्रीम चेहऱ्याला लावावं. सीसी क्रीम लावताना ब्रशचाही वापर करता येतो. 

Image: Google

का लावावं सीसी क्रीम?

सीसी क्रीममध्ये जीवनसत्वं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस हे गुणधर्म असतात. सीसी क्रीममुळे त्वचेच्या बाह्य भागाचं संरक्षण होतं.  सीसी क्रीममध्ये ग्रीन टी, सोया आणि शीया बटर असतं. या घटकांमुळे त्वचा मऊ होतं. सीसी क्रीममुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. सीसी क्रीममुळे चेहऱ्यावरचा लालसरपणा, मुरुम पुटकुळ्या, डाग  सहज झाकले जाऊन त्वचा फ्लाॅलेस दिसते. 

सीसी क्रीम  कलर कंट्रोल करेक्टर क्रीम. चेहरा उजळ दिसण्यासाठी, त्वचेवर चमक दिसण्यासाठी सीसी क्रीम लावलं जातं. सीसी क्रीममुळे डोळ्याखालची काळी वर्तुळं झाकली जातात. सीसी क्रीम अत्यंत लाइट असल्यानं मूळ त्वचेत ते सहज मिसळलं जातं. सीसी क्रीम लावल्यानंतर चेहऱ्याला थर दिल्याप्रमाणे वाटत नाही. सीसी क्रीम घामामुळे निघून जात नाही. सीसी क्रीम लावल्यानं चेहरा सुंदर तर दिसतोच पण त्वचेचं उन्हापासून संरक्षणही होतं. 


 

Web Title: Apply CC cream to make your face glow? Now make that cream at home in just 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.