केस गळणे आणि नीट न वाढणे अशा समस्या अनेकांना छळतात (Hair Growth). विशेषतः महिलांना केस गळतीचा फार त्रास होतो. केसांचे सौंदर्य केसात दडले असते. पण केस गळती रोखण्यासाठी आणि केसांच्या ग्रोथसाठी महिला अनेक गोष्टी करतात (Hair Tips). काही उपाय फेल तर काही उपायांमुळे केसांची नैसर्गिक वाढ होते (Coconut for Hairs). त्यातील एक उपाय म्हणजे केसांना तेल लावणे.
वर्षानुवर्षे आपण केसांना तेल लावत आलो आहोत. पण तरीही तेलातील पोषण स्काल्प आणि केसांना मिळत नाही. त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर शिवांती एमडी यांनी केसांच्या समस्या सोडवण्यासाठी तेलाचा वापर नेमका कसा करावा? केसांच्या वाढीसाठी केसांना तेल कसे लावायचे ते सांगितले(Apply Coconut Oil for Hair Growth at Home: It Works!).
केसांच्या वाढीसाठी तेल लावण्याची योग्य पद्धत
त्वचारोगतज्ज्ञ सांगतात, केसांसाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरते. केसांना तेल लावण्यापूर्वी ते थोडे गरम करा. केसांना कोमट तेल लावल्याने स्काल्पला पोषण मिळते. केसांची मुळे तेल चांगल्या प्रकारे शोषून घेतात आणि मुळांना पुरेसा ओलावाही मिळतो. जर आपल्या चेहऱ्यावर पुरळ, आणि केसात जास्त कोंडा असेल तर, मुळांना तेल लावणे टाळा. असा सल्ला तज्ज्ञ देतात.
खोबरेल तेलात मिसळून केसांना लावा २ घरगुती गोष्टी; आजीच्या पोटलीतला खास उपाय
केस धुण्याच्या २ ते ३ तास आधी केसांना तेल लावा. रात्रभर तेल केसांवर तसेच ठेवल्याने केसांना विशेष फायदा होत नाही. रात्रभर तेल केसांवर लावून ठेवल्याने मुरुम आणि कोंड्याची समस्या आणखी वाढू शकते.
केसांचा भांग रुंद, पांढरे केस झाले? होमिओपॅथी तज्ज्ञांनी सांगितलं खोबरेल तेलाचा 'असरदार' उपाय
तेल लावण्याच्या काही वेळानंतर नेहमीच्या शाम्पूने केस धुवा. केसातून तेल काढण्यासाठी दोनदा शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून २ वेळा आपण केसांना तेल लावून मसाज करू शकता.