Join us  

चेहरा अजिबात काळा पडणार नाही; आंघोळीनंतर १ काम करा, दिवसभर फ्रेश दिसेल त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 2:32 PM

Apply these things on the face after bath : अंघोळीनंतर चेहऱ्यावर फेसवॉशचा वापर करता. याशिवाय चेहराही स्वच्छ ठेवणं तितकंच महत्वाचं आहे.

प्रत्येकजण रोज अंघोळ करत असला तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा ग्लो वेगवेगळा असतो. तर काहीजणांचा चेहरा लगेच काळा पडतो.  याचं कारण स्किन केअर रुटीन फॉलो रुटीन न करणं हे असू शकतं. (Post Shower Tips for Gorgeous Skin) त्वचा दिवसभर फ्रेश चांगली दिसण्यासाठी अंघोळीनंतर काही गोष्टींचा वापर केल्यास चेहरा दिवसभर ग्लोईंग दिसण्यास मदत होईल.  (Apply these things on the face after bath)

चेहरा स्वच्छ करा

अंघोळीनंतर चेहऱ्यावर फेसवॉशचा वापर करा. सकाळी कोमट पाण्यानं चेहरा धुवा. फेसवॉशच्या मदतीनं चेहऱ्यावरची घाण निघून जाण्यास मदत होईल.  यामुळे त्वचेवर चांगल ग्लो येईल. त्वचेवर कडक  गरम पाण्याचा वापर कधीच करू नका. अन्यथा त्वचा कोरडी पडू शकते. 

सिरम लावा

चेहरा स्वच्छ केल्यानंतर सिरमचा वापर करा. सिरमच्या वापरानं चेहरा हायड्रेट राहण्यास मदत होते. सिरम ग्लोईंग स्किनचं सिक्रेट आहे. रोज अंघोळीनंतर सिरम लावल्यानं काही दिवसातच फरक दिसून येईल. हे सिरम त्वचेत सहज शोषलं जातं. 

मॉईश्चरायजर लावा

चेहऱ्यावर  सिरम लावल्यानंतर मॉईश्चरायजर लावा. मॉईश्चरायजर लावल्यानं तुमची त्वचा सॉफ्ट राहील. स्किन टाईपनुसार मॉईश्चरायजरची निवड करावी. मॉईश्चरायजरच्या नियमित वापरानं त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊन त्वचा ग्लोईंग होते.

फेशियल क्रिम

अंघोळ करताना त्वचेवर फेशियल क्रिम लावायला विसरू नका.  फेशियल क्रिममुळे त्वचेवर कोरडेपणा येत नाही. याशिवाय त्वचा उजळदार दिसते.

१) स्किन हेल्दी राहण्यासाठी आठवड्यातून एकदा वाफ घ्या. फेस स्टिमिंगनं पोर्स ओपन होतात. ज्यामुले ब्लॅकहेट्स आणि व्हाईटहेट्सचा त्रास कमी होतो. 

२) त्वचेवर फेसमास्कचा वापर करा. आपल्या स्किन टाईपनुसार मास्क खरेदी करा. तुम्ही घरच्याघरीही मास्क बनवू शकता. 

३) आठवड्यातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करा. एक्सफोलिएशननं मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि ग्लोईंग दिसते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी