डोळे चमकदार आणि आकर्षक दिसण्यासाठी आपण अनेकवेळा डोळ्यांना महागडे प्रोडक्ट्स लावून सजवतो. मात्र, डोळ्यांना इजा होईल का याची काळजीही घ्यायला हवी. डोळ्यांना आपण आयलायनर, काजळ लावून सजवतो, आणि यासह पापण्या मोठे दिसण्यासाठी आपण फेक आयलॅश लावतो. फेक आयलॅश चांगले दिसतात. परंतु, या फेक आयलॅशमुळे आपल्या पापण्यांना इजा देखील होऊ शकते. फेक आयलॅशचे काही साईडइफेक्ट्स देखील आहेत. म्हणून लक्षात ठेवा काही टिप्स.
योग्य ग्लू निवडा
खरं तर, डोळ्यांवर बनावट पापण्या लावण्यासाठी एक प्रकारचा गोंद वापरला जातो, ज्यामुळे कधीकधी डोळे आणि पापण्यांच्या त्वचेला संसर्ग होतो. ज्यांना त्वचेची ऍलर्जी आहे त्यांनी ते लावणे टाळावे, अन्यथा त्यांच्या त्वचेवर खाज येणे, जळजळ, पुरळ यासारख्या समस्या सुरू होऊ शकतात. याशिवाय पापण्यांसोबत येणाऱ्या गोंदऐवजी चांगल्या ब्रँडचे ग्लूचे पॅकेट विकत घेऊन तुम्ही ते वेगळे वापरू शकता. यामुळे तुमच्या पापण्यांना इजा होणार नाही.
पापण्यांच्या केसांवर परिणाम
अनेकवेळा अनैसर्गिक पापण्यांमुळे खऱ्या पापण्यांना इजा पोहचू शकते. काही लोकं काहीच नसलेल्या ज्ञानाअभावी फेक आयलॅश वापरतात. त्यामुळे बऱ्याचवेळा अति वापराने, नैसर्गिक पापण्या फिकट होऊ लागतात. त्यामुळे अशा उत्पादनांचा वापर कमीत कमी ठेवला पाहिजे. काहीवेळा ग्लू आपल्या नैसर्गिक पापण्यांवर चिटकून बसते. त्यामुळे बहुतांशवेळा फेक आयलॅश काढताना आपले खऱ्या आयलॅशचे केस निघू शकतात, आणि डोळ्यांना देखील इजा होऊ शकते. त्यामुळे फेक आयलॅशचा वापर कमी करावा.
फेक आयलॅश लावण्यापूर्वी लक्षात ठेवा ही गोष्ट
जर तुम्ही फेक आयलॅश लावत असाल तर, पापण्यांच्या वरच्या बाजूस ग्लू लावणे योग्य ठरते. जेणेकरून अतिरिक्त ग्लू तुमच्या त्वचेवर किंवा तुमच्या डोळ्यांतील केसांवर येणार नाही. आणि पापण्यांना काही इजा होणार नाही.