त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास सुरकुत्या येऊ शकतात. अधिकाधिक लोकांना नाक, गाल आणि माथ्यावर डाग दिसून येतात. सुरकुत्या येण्याची अनेक कारणं असू शकता. ऊन्हामुळे हानीकारक मेलानिन फॉर्मेशन वाढते ज्यामुळे त्वचा डार्क दिसू लागते. हॉर्मोनल इब्लेंन्समुळे त्वचेवर जखमेप्रमाणे इंफ्लेमेशन उद्भवते. अशा स्थितीत चेहऱ्यावर पिग्मेंटेशन येण्याची समस्या उद्भवू शकतात. त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या युक्त्या वापरू शकता. (Appy These 3 Things Can Reduce Pigmentation)
बटाट्याचा रस
पिग्मेंटेशनवर हलक्या हातानं बटाट्याचा रस लावू सकता. बटाट्याच्या रस कापसाच्या मदतीने चेहऱ्याला 15 ते 20 मिनिटं लावून ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा.
दही
चेहऱ्यावर मॉईश्चर टिकून राहण्यासाठी तुम्ही दही लावू शकता. चेहऱ्यावर दही लावल्यानं त्वचेला लॅक्टिक एसिड मिळते जे स्किन एक्सफोलिएट करते आणि सुरकुत्या कमी होऊ लागतात. चेहऱ्यावर दही 20 ते 25 मिनिटांसाठी लावून ठेवा नंतर साध्या पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवा.
टोमॅटोचा रस
टोमॅटोमध्ये ब्लिचिंग गुण असतात ज्यामुळे त्वचेच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर टोमॅटो लावल्यानंतर याचा रस एका वाटीत काढून घ्या. चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटं लावून ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा आठवड्यात 3 ते 4 वेळा टोमॅटो चेहऱ्यावर लावल्यानं सुरकुत्या कमी होतात.
मसूरची डाळ रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाटून याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून जेणेकरून पिग्मेंटेशन हलकं होईल. आठवड्यातून एक दिवस हा फेस पॅक लावू शकता.
पपईचा फेस मास्क तुम्ही चेहऱ्याला लावू शकतात ज्यामुळे सुरकुत्या कमी होता. पपई वाटून 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवून साफ करा. या फेस मास्कचा चेहऱ्यावर चांगला परिणाम दिसून येईल.
एलोवेरा जेल नियमित चेहऱ्याला लावल्यानं त्वचेवर पिग्मेंटेशन येत नाहीत. सुरकुत्यांवर तुम्ही रोज एलोवेरा जेल लावू शकता.