केसांवरून कंगवा फिरवल्यावर पुंचक्याच्या पुंचके हातात येतात.आणि मग प्रचंड केस गळतात, आता टक्कलच पडायचं बाकी राहिलं आहे.(Are you washing your hair properly? ) असं म्हणून आपण वेगवेगळे उपाय करतो. आयुर्वेदिक उत्पादकांचा वापर सुरू करतो. डॉक्टरांची औषध सुरू करतो. आहार बदलतो. तरी केस गळतातच. आता करूतरी काय असा प्रश्न पडतो?.(Are you washing your hair properly? ) प्रदूषणामुळे, पाण्यामुळे अनेक कारणांनी केस गळतात. पण केस चुकीच्या पद्धतीने धुतल्यामुळे जर गळत असतील तर? हा विचार आपण करतच नाही. शाम्पू नाही तर केस धुवण्याची चुकीची पद्धत वापल्यानेसुद्धा केस गळतात. जर तुम्हीही चुकीच्या पद्धतीने नाहत असाल तर आजच थांबवा.
डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी केस धुताना काय करावे आणि काय करू नये याची यादी सांगितली आहे. प्रत्येकाने त्याचनुसार केस धुणे केसांसाठी फायदेशीर ठरेल.
हे करु नका.(Are you washing your hair properly? )
१. गरम पाण्याने केस धुता? लगेच बंद करा. कोमट पाणी चालेल. केस कोरडे पडतात आणि कमकूवत होतात.
२. केमिकलयुक्त काहीच केसांना लाऊ नका. पाण्याचा जास्त वापर करून केस धुवा.
३. केस पंच्याने रगडु नका. ओले केस फक्त टिपा. मोकळे ठेवा त्यांचे ते सुखतील.
४. धुतलेले केस कधीच विंचरू नका. ते आरामात तुटून जातात.
५. केस घट्ट बांधू नका. ताणले गेल्याने केस तुटतात.
६. ड्रायर, स्ट्रेटनर वापरू नका. केस कमकूवत होतात.
हे करा.
१. योग्य शाम्पू वापरा. तेलकट केस, कोरडे केस प्रकारानुसार शाम्पू निवडा.
२.अति शाम्पू नका लाऊ.थोडा शाम्पू पाण्यात घाला आणि व्यवस्थित चोळून केस धुवा.
३.टाळूचा काळजी घ्या. टाळू स्वच्छ ठेवा.
४. तेल लावायला आवडत नाही अशी कारणे न देता. नियमित केसांना तेल लावा. मसाज करा.
आठवड्यातले सगळे दिवस केस धुवू नका. तीन दिवस केस धुणे पुरेसे आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा.