Lokmat Sakhi >Beauty > सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे भप्प सुजलेले दिसतात? ६ उपाय, सूज होईल कमी..

सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे भप्प सुजलेले दिसतात? ६ उपाय, सूज होईल कमी..

6 Easy Ways To Get Rid Of Puffy Eyes : सकाळी डोळ्यांखाली कायम सूज येत असेल तर काही साधे उपाय करता येतील, पण सूज येते कशाने यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2023 05:49 PM2023-02-06T17:49:08+5:302023-02-06T18:02:33+5:30

6 Easy Ways To Get Rid Of Puffy Eyes : सकाळी डोळ्यांखाली कायम सूज येत असेल तर काही साधे उपाय करता येतील, पण सूज येते कशाने यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या..

Are your eyes puffy when you wake up in the morning? 6 solutions, swelling will reduce.. | सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे भप्प सुजलेले दिसतात? ६ उपाय, सूज होईल कमी..

सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे भप्प सुजलेले दिसतात? ६ उपाय, सूज होईल कमी..

आपण बऱ्याचदा पाहिले असेल की सकाळी उठल्यावर बऱ्याच लोकांना डोळ्यांखाली, पापण्यांना हलकीशी सूज येते. डोळ्यांना सूज येणे ही समस्या अनेक कारणांमुळे असू शकते. हे सामान्य कारणांमुळे देखील असू शकते जसे की झोप न लागणे, तणाव आणि ऍलर्जी किंवा त्याचे गंभीर कारण देखील असू शकते. डोळ्यांना सूज येणे अगदी सामान्य असले तरीही हे वारंवार होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्यावा.

सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांना अशी सूज आली असल्यास आपला विचित्र दिसतोच. त्याचप्रमाणे ही सूज जर दोन ते तीन तास राहिली तर कधीकधी चेहरा देखील खराब दिसतो. डोळ्यांना व पापण्यांना आलेली सूज तशीच राहिल्यास आपल्याला तसाच चेहेरा घेऊन ऑफिसमध्ये किंवा इतर कामाच्या ठिकाणी जाणे कठीण होते. अशा परिस्थिती काही सोपे उपाय करून आपण ही डोळ्यांची व पापण्यांची सूज लगेच घालवू शकतो(6 Easy Ways To Get Rid Of Puffy Eyes). 

नक्की काय उपाय करता येऊ शकतो? 

१. टी बॅगचा वापर करा -  बऱ्याच लोकांना ग्रीन टी किंवा टी बॅग वापरुन चहा पिण्याची सवय असते, असे लोकं चहा प्यायल्यानंतर चहाची टी बॅग फेकून देतात. परंतु तसे न करता या पिशवीचा आपण पुन्हा वापर करु शकता. डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. चहाच्या पिशव्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म सूज कमी करण्यासाठी तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. यासाठी चहाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवा आणि रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर सुमारे १५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

२. बर्फाचा खडा - बर्फाचा खडा वापरल्याने डोळ्यांवरील सूज दूर होते. सुती कपड्यात बर्फाचा खडा गुंडाळा आणि डोळ्यांना मसाज करा. यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल.

३. चमच्याचा वापर करा -  २ किंवा ३ चमचे घ्या आणि १० ते १५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर चमच्याच्या विरुद्ध बाजूने चमचा डोळ्यांवर लावा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळून सूज कमी होईल. 

ankitakariya या इंस्टाग्राम पेजवरून सकाळी उठल्यानंतर डोळ्यांना येणारी सूज म्हणजे पफी आईजची (Puffy Eyes) समस्या कशी दूर करावी याबद्दलचे उपाय शेअर करण्यात आले आहेत.  

४. एलोव्हेरा जेल - सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम थंड पाण्याचा हबका संपूर्ण चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर मारून डोळे स्वच्छ करून घ्यावेत. त्यानंतर डोळ्यांच्या आजूबाजूला ज्या भागांवर सूज आली आहे, त्या भागांवर बोटांच्या मदतीने एलोव्हेरा जेल लावून मसाज करावा. यामुळे काही काळानंतर आपल्या  डोळ्यांची सूज कमी होऊन हळुहळु डोळे पूर्ववत होतील. 

५. बटाट्याचे काप डोळ्यांची सूज कमी करतात -  सुरूवातीला बटाटे किसून घ्या आणि त्याचा रस काढा. त्यानंतर कापसाने तो रस आपल्या डोळ्यांना लावा. रस १५ ते २० मिनिटे ठेवावा. यामुळे हळूहळू डोळ्यांची सूज कमी होईल. त्याचबरोबर घाईच्या वेळी बटाट्याचा किस करण्यास वेळ नसेल तर कच्च्या बटाटाच्या गोल चकत्या कापून त्या डोळ्यांवर ठेवाव्यात. यामुळे देखील डोळ्यांना थंडावा मिळून सूज उतरण्यास मदत होईल. 

६. गुलाब पाणी - गुलाब पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी आपण गुलाबपाणी वापरू शकता. यासाठी, गुलाबाचे पाणी अर्ध्या तासासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे लागेल. यानंतर, कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली हे पाणी लावा.

Web Title: Are your eyes puffy when you wake up in the morning? 6 solutions, swelling will reduce..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.