थंडी कधीच एकटी येत नाही. येताना भरपूर आजारपणं घेऊन येते. सर्दी, खोकला, ताप आणि बरंच काही.(Are your feet cracked and chapped? Just follow this simple remedy.. ) थंडीत काही जणांच्या तर चालण्याही वांदे होऊन जातात. थंडीत बऱ्याच जणांचे पाय फुटतात. काहींना तर खूपच जास्त त्रास होतो. भेगा पडून त्यातून रक्त वगैरे येते. पायाची सालं जातात. (Are your feet cracked and chapped? Just follow this simple remedy.. )त्वचेची साफ वाट लागून जाते. काही सोपे उपाय करून हा त्रास कमी करता येतो. घरच्या घरी हे उपाय करता येतात. फक्त तुमच्या दिनचर्येत या दोन गोष्टींचा समावेश करून घ्या.
तुम्ही तुमच्या आजीकडून कोकम तेलाबद्दल ऐकले असेल. हे तेल प्रचंड औषधी आहे. त्याचा वापर नियमित केल्याने आराम नक्कीच मिळेल. कोकम तेल शरीराला आर्द्रता पोहचवते. कोकम तेलात अॅन्टीऑक्सिडेंट्स असतात. तसेच त्यात जीवनसत्त्व 'ई' असते. ते त्वचेसाठी फार पोषक ठरते. कोकम तेलाचा वापर त्वचेसाठी आपण जी महागडी सौंदर्यप्रसाधने वापरतो, त्यात केलेला असतो. त्यामुळे ती विकत घेण्यापेक्षा थेट कोकम तेलच वापरा. त्याचा फायदा जास्त होईल. पायाच्या भेगांसाठी आपण जे मलम वापरतो, त्यातही कोकम तेलच असते. बाजारात कोकम तेल विकत मिळते. द्रव रुपातील तेल वापरण्यापेक्षा कोकम तेलाचा घट्ट असा दगड विकत मिळतो. तो उगाळून वापरा.
रोज रात्री झोपताना पायाला कोकम तेल लावा. नीट चोळून लावा. लगेच आराम मिळणार नाही. पण फरक जाणवायला लागेल. महिनाभर तरी रोज पायाला ते तेल लावा. आठवड्यातून कमीत कमी ३ वेळातरी पाय गरम पाण्यात बुडवून ठेवा. पायाच्या भेगांमध्ये अडकलेली घाण निघून जाईल. भेगांतून रक्त येणार नाही. पाय शेकवून झाल्यावर ते पूर्णपणे कोरडे करून घ्या. कोकम तेल लावा आणि मग झोपा. रात्री पायांचा वापर आपण करत नाही. त्यामुळे पायाला तेल लावायची ती योग्य वेळ आहे. सकाळी पाय पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवा.
हा उपाय वर्षानुवर्षे चालत आला आहे. नक्की करून बघा. जर ओठ फुटले असतील, तर त्यासाठी ही कोकम तेल उत्तम आहे. एकंदरीत थंडीच्या दिवसात कोकम तेल जवळ असावेच.