आपल्या चेहऱ्यावर शोभून दिसतात ते ओठ. व्यक्ती बोलताना आपले लक्ष ओठांकडे जातेच. प्रत्येकाला आपले ओठ सुंदर, गुलाबी, आकर्षक दिसावेत असे वाटते. परंतु, चुकीच्या सवयींमुळे ओठ काळे पडतात. ओठांना एक्सफोलिएट करणे गरजेचं आहे, असे न केल्यास त्वचेवर डेड स्किन जमा होते. ज्यामुळे ओठांवर सुरकुत्या तर येतातच पण ओठांची त्वचाही खराब होते.
आपले ओठ काळे का पडतात? ओठांची काळजी कशी घ्यावी? ओठांवर नैसर्गिक - गुलाबी रंग येण्यासाठी काय करावे? हे प्रश्न तुमच्याही मनात पडले असतील. पिंक लिप्स हवे असतील तर या ४ सवयी बदलणे गरजेचं आहे. या चुका टाळल्याने ओठांवर नैसर्गिक रंग येईल(Are your lips getting darker? You may find the reasons here).
धुम्रपान
धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक असते. त्याचा फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो. यासह ओठ देखील काळे पडतात. धूम्रपानासोबत कॅफीनचे जास्त सेवन केल्याने ओठ काळे होऊ शकतात. त्यामुळे धुम्रपान करणे टाळा.
नेहमी गळतात त्यापेक्षा पावसाळ्यात तिप्पट जास्त गळतात केस, तज्ज्ञ सांगतात अशावेळी काय करावे?
लिपस्टिकची ऍलर्जी
बाजारात अनेक प्रकारच्या लिपस्टिक उपलब्ध आहेत. काही चांगल्या, तर काहींच्या वापरामुळे ओठ काळे पडतात. लिपस्टिकमध्ये असणारे रसायने ओठ काळे करण्याचे काम करतात. याशिवाय, ऍलर्जीमुळे, ओठांवर हायपरपिग्मेंटेशनची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे ओठ काळे पडतात.
डिहायड्रेशन
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठांचा रंग काळा होऊ शकतो. डिहायड्रेशनमुळे, ओठ फक्त कोरडे होत नाहीत तर, तर ते काळे ही होतात. त्यामुळे पुरेसे पाणी पीत राहा.
व्हिटामिन ई केसांना नक्की कसे लावायचे? पाहा २ व्हिटामिन ई कॅप्सुल केसांवर काय कमाल करतात...
डेड स्किन
त्वचेप्रमाणेच ओठांना वेळोवेळी एक्सफोलिएट करत राहणे आवश्यक आहे. अन्यथा मृत त्वचेचा थर साचतो, ज्यामुळे ओठ काळे दिसू लागतात. ओठांना एक्सफोलिएट करण्यासाठी लिंबू आणि साखरेचा स्क्रब लावा, याने ओठांवरील डेड स्किन निघून जाईल.