Lokmat Sakhi >Beauty > चिमूटभर हिंग आणि चेहऱ्यावर चमक ! विश्वास नसेल बसत तर लावून पाहा हिंगाचा फेसपॅक...

चिमूटभर हिंग आणि चेहऱ्यावर चमक ! विश्वास नसेल बसत तर लावून पाहा हिंगाचा फेसपॅक...

Get Rid Of Common Skin Problems By Using This Amazing Asafoetida Hing Face Pack : हिंग फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर आहे, पिगमेंटेशन आणि वाढलेल्या वयाच्या खुणाही होतील कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 09:00 AM2023-07-21T09:00:20+5:302023-07-21T11:51:34+5:30

Get Rid Of Common Skin Problems By Using This Amazing Asafoetida Hing Face Pack : हिंग फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर आहे, पिगमेंटेशन आणि वाढलेल्या वयाच्या खुणाही होतील कमी...

Asafoetida or Hing Can Resolve Many Skincare Problems, Here Is How | चिमूटभर हिंग आणि चेहऱ्यावर चमक ! विश्वास नसेल बसत तर लावून पाहा हिंगाचा फेसपॅक...

चिमूटभर हिंग आणि चेहऱ्यावर चमक ! विश्वास नसेल बसत तर लावून पाहा हिंगाचा फेसपॅक...

सध्याचे धकाधकीचे आयुष्य,ऑफिस तसेच घरातील काम या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे आपल्या आरोग्याबरोबरच  त्वचेवर देखील याचा वाईट परिणाम दिसू लागतो. त्वचेची देखभाल न केल्यास गंभीर त्वचा विकार उद्भवण्याची भीती असते. मुरुम येणे, त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावर डाग येणे यांसारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या ब्युटी केअर रुटीनवर लक्ष देण्यास सुरुवात करतो. 

आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन, मुलतानी माती यासारख्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या पावडरचा वापर करतो. याचसोबत आपल्या किचनमधील गरम मसाल्यातील हिंगाचा योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास त्वचेसाठी लाभदायक ठरू शकते. हिंगामुळे जेवणाची चव वाढते. यासोबतच पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. चिमूटभर हिंगाचे सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत. धूळ, माती, प्रदूषणामुळे चेहऱ्याचा रंग तसेच पोत बिघडतो. यामुळे चेहऱ्यावर तेज देखील कमी होते. त्वचेवरील छिद्रांमध्ये घाण जमा झाल्यास मुरुमांचीही समस्या निर्माण होते. मुरुम येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी हिंगाचा वापर आपण करु शकतो. हिंगाच्या फेसपॅकमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत मिळते(Asafoetida or Hing Can Resolve Many Skincare Problems, Here Is How).

हिंगाचा वापर करुन फेसपॅक नेमका कसा बनवावा... 

हिंगाचा फेसपॅक बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये, दोन चमचे मुलतानी माती, त्यात एक चमचाभर मध, चिमूटभर हिंग व एक चमचा गुलाब पाणी मिसळून घ्यावे. हे सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण चेहेऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटे तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर थंड पाण्याने चेहेरा स्वच्छ धुवून घ्यावा. या फेसपॅकच्या वापरामुळे मुरुम, काळे डाग, सुरकुत्या, त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. या फेसपॅकच्या नियमित वापराने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

कोण म्हणतं सेंन्सिटिव्ह स्किन असेल तर हळद लावू नये? हळदीसारखे इफेक्टिव्ह काही नाही कारण...

क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?

हिंगाचा फेसपॅक वापरल्याने त्याचे कोणते फायदे त्वचेला होतात... 

१. पिंपल्सच्या समस्येवर हिंगाचा फेसपॅक खूपच फायदेशीर ठरतो. हिंग त्वचारोगांशी कारणीभूत असलेल्या जंतूंशी लढते आणि त्वचेला मुरुमांच्या डागांपासून संरक्षित करते. 

२. धूळ-माती प्रदूषणामुळे जर आपली त्वचा निस्तेज आणि कोरडी झाली असेल, तर हिंगाचा आपल्या त्वचेसाठी फायदा होऊ शकतो. ते त्वचेला मॉइश्चराईझ करते आणि दीर्घकाळ चमकदार ठेवते.

३. त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी हिंगाचा वापर देखील फायदेशीर ठरू शकतो. यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. त्वचा तरुण दिसते. तेलकट त्वचेपासूनही सुटका मिळते.

चेहऱ्यावर करा बटाटा आइस क्यूबची जादू, चेहऱ्यावर येईल कधीही न आलेली सुंदर चमक...

प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा सांगतात, खास घरगुती फेसपॅक - चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू...

४. हिंगामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात जे चेहेऱ्यावर वाढत्या वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या व वृद्धत्वाच्या खुणा येण्यापासून त्वचेचा बचाव करतात. या फेसपॅकमुळे त्वचेवरील बारीक रेषा आणि गडद डागांच्या समस्येपासून देखील आराम देऊ शकते.

५. जर आपल्या त्वचेला कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला असेल जसे की खाज येणे, रॅशेज येणे, त्वचा काळवंडणे यांसारख्या समस्यांना प्रतिबंध करते. हिंग हे थंड प्रभावाचे असते. त्वचेच्या समस्यांसाठी कारणीभूत असणारे बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते.

Web Title: Asafoetida or Hing Can Resolve Many Skincare Problems, Here Is How

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.