एखादा कार्यक्रम जेव्हा आधीपासूनच ठरलेला असतो, तेव्हा आपण त्यासाठी पुर्णपणे तयारी करतो. त्यादिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी केस धुवून व्यवस्थित सेटिंग करून ठेवतो. पण अचानक जर एखादा कार्यक्रम ठरला आणि त्यावेळी नेमके आपले केस धुतलेले नसतील, तर मात्र आपली चांगलीच तारांबळ उडते. ड्रेसिंग आणि बाकीच्या मेकअपचं टेन्शन नसतं. पण नेमकं होतं काय की तेलकट केसांमुळे हेअरस्टाईल (hair styles with oily hair) शोभून दिसत नाही आणि मग त्यामुळे ड्रेस आणि मेकअपही उठून दिसत नाही. त्यामुळे मग एकंदरीतच आपली पर्सनॅलिटी आपोआपच डाऊन दिसू लागते. (How can we look stylish with oily hair?)
म्हणूनच जर कधी ऐनवेळी तुमचं एखाद्या कार्यक्रमाला किंवा कुठे बाहेर जाण्याचं ठरलं तर अशावेळी एकदम भांबावून जाऊ नका. केस धुण्याइतका वेळ तर त्यावेळी आपल्याकडे नसतो. म्हणून मग अशावेळी केसांची ही अशी काही स्टाईल करून बघा. यामुळे केस तेलकट असले तरी व्यवस्थित बसतील आणि शिवाय जसे आहात तशा केसांमध्येही उठून दिसू शकाल. यापैकी काही हेअरस्टाईल इन्स्टाग्रामच्या the.bizarre.soul या पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत.
तेलकट केसांसाठी हेअरस्टाईल
१. तेलकट केसांसाठी सागरचोटी किंवा सागरवेणी चांगली दिसू शकते. त्यातही तुम्ही दोन प्रकार करू शकता. समोरच्या बाजूने सागरवेणी आणि मागचे केस मोकळे असंही करू शकता किंवा मग मागचे केस मोकळे न सोडता त्याचीही वेणी घालू शकता.
२. तेलकट केसांचा फ्रेंच रोल घातला तरी तो चांगला दिसतो. कारण तसेही फ्रेंच रोलमध्ये सगळे केस आपण बांधूनच घेतो. त्यामुळे केस ऑईली असले तरीही फ्रेंच रोल चांगला दिसेल.
३. कुठल्याही कार्यक्रमाला न जाता असंच कॅज्युअली फिरायला बाहेर पडणार असाल किंवा मग शॉपिंग, हॉटेलिंग यासाठी जाणार असाल तर मागून सगळे केस वरच्या बाजूने उचलून घ्या आणि त्यांचा उंच आंबाडा घाला.
४. यात आणखी देखणा लूक आणायचा असेल तर मागच्या बाजूने वरपर्यंत वेणी घाला आणि ती आंबाड्याभोवती गुंडाळा.
५. केस मोठे असतील तर सगळे केस एका बाजूने वळवून घेऊन त्याची साईडवेणीही घालू शकता.