आता वातावरणात चांगलीच कडाक्याची थंडी जाणवायला लागलेली आहे. त्यामुळेच सकाळी आणि रात्रीही स्वेटर घालावं लागतं. दिवसभरही गारवा असल्याने उबदार कपड्यांची चांगलीच गरज भासायला लागली आहे. अशातच आता आपल्या त्वचेनेही थंडीमुळे तिच्यावर कसा परिणाम होत आहे हे दाखवायला सुरुवात केली आहे. त्वचा कोरडी पडत आहे आणि डोक्याची त्वचासुद्धा कोरडी होऊन कोंड्याचे प्रमाणही वाढले आहे (Skin Care And Hair Care Tips For Winter). डोक्यातला कोंडा वाढला की केस गळायलाही सुरुवात होतेच. म्हणूनच या सगळ्याच गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून काय उपाय करावा याची ही खास माहिती..(avoid 1 mistake in winter season for maintaining soft skin and healthy hair)
हिवाळ्यात केसांची आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी?
हिवाळ्यात त्वचेची आणि केसांची काळजी घ्यावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ dr.priyanka.abhinav_750 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
Thushi Bangles: कमी सोन्यामध्ये घ्या ठसठशीत ठुशी बांगडी, लग्नसराईसाठी करा देखणी खरेदी
यामध्ये सांगण्यात आलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हिवाळ्यात थंडीचा कडाका जाणवू लागला की आपण अधिकाधिक गरम पाणी घेऊन आंघोळ करतो. गरम पाण्यानेच केस धुतो. पण असे गरम पाणी आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी मुळीच चांगले नाही. त्यामुळे हिवाळ्यात केस आणि किमान चेहरा धुण्यासाठी तरी गरम पाण्याचा वापर करू नका. चेहरा आणि केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच वापरावे.
खूप गरम, कडक पाण्याने केस धुतल्यास केसांची मुळं कमजोर होतात आणि केस गळण्याचं प्रमाण वाढू लागतं. तसेच खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेचं नुकसान होतं. चेहऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते.
९० टक्के लोक 'ही' चूक करतात म्हणूनच त्यांना मिळत नाही डाळ-वरणातलं प्रोटीन! डाळी खायच्या तर...
गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी पडून लवकर सुरकुत्या येण्यास सुरुवात होते. म्हणूनच या दिवसात त्वचेची थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात ३ ते ४ थेंब खोबरेल तेल किंवा लिंबाचा रस टाकून आंघोळ करा, यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. त्वचेला छान पोषण मिळेल असंही एक्सपर्ट सांगतात.