Lokmat Sakhi >Beauty > पावसाळ्यात अजिबात खाऊ नका ४ गोष्टी, खाल्ल्या तर वाढतील चेहऱ्यावरचे पिंपल्स-येतील फोड

पावसाळ्यात अजिबात खाऊ नका ४ गोष्टी, खाल्ल्या तर वाढतील चेहऱ्यावरचे पिंपल्स-येतील फोड

Avoid 4 Foods in Monsoon for Skin Related Problems : पावसाळ्यातही सुंदर आणि ग्लोईंग त्वचा ठेवायची असेल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 11:21 AM2022-07-08T11:21:07+5:302022-07-08T11:26:59+5:30

Avoid 4 Foods in Monsoon for Skin Related Problems : पावसाळ्यातही सुंदर आणि ग्लोईंग त्वचा ठेवायची असेल तर...

Avoid 4 Foods in Monsoon for Skin Related Problems : 4 things not to eat in the rainy season, if eaten, pimples on the face will grow Skin care tips | पावसाळ्यात अजिबात खाऊ नका ४ गोष्टी, खाल्ल्या तर वाढतील चेहऱ्यावरचे पिंपल्स-येतील फोड

पावसाळ्यात अजिबात खाऊ नका ४ गोष्टी, खाल्ल्या तर वाढतील चेहऱ्यावरचे पिंपल्स-येतील फोड

Highlightsपालक आरोग्यासाठी चांगला असला तरी पावसाळ्यात तो कमी प्रमाणात खायला हवा.   पावसाळ्यात कितीही खावेसे वाटले तरी तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ ठराविक प्रमाणातच खायला हवेत. 

पावसाळ्यात दमट हवा असल्याने पोटाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. पोट खराब असेल तर त्याचा परीणाम नकळत आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे फोड येणे, पुटकुळ्या येणे, पिंपल्स येणे अशा समस्या उद्भवतात (Monsoon Special). पावसाळ्याच्या दिवसांत दमट हवामानामुळे आणि पचनशक्ती क्षीण झाल्यामुळे पोट फुगणे, गॅसेस, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी अशा तक्रारी उद्भवतात (Skin Care Tips). या सगळ्या तक्रारींवर आहार चांगला असणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे पावसाळ्यात ताजा, गरम आणि हलका आहार घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. पावसाळ्यातही सुंदर आणि ग्लोईंग त्वचा ठेवायची असेल तर आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला नको ते पाहूया (Avoid 4 Foods in Monsoon for Skin Related Problems)...

घरगुती गोष्टी वापरून फक्त १०० रुपयांत करा फेशियल, नॅचरल फेशियल-साइड इफेकट्स नाहीत..

१. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ 

दूध प्रमाणात पिणे ठिक आहे, पण ते जास्त प्रमाणात प्यायल्यास त्याचा हार्मोन्सवर परिणाम होतो. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती क्षीण होते आणि दूध पचायला काही प्रमाणात जड असते. हार्मोन्समध्ये होणारे बदल लगेचच आपल्या त्वचेवर रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे त्वचेवर फोड, पिंपल्स यायला वेळ लागत नाही. म्हणून शक्यतो या दिवसांत दूध कमी प्रमाणात घ्यायला हवे.

(Image : Google)
(Image : Google)

२. हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ 

ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो अशा पदार्थांमुळे त्वचेवर फोड येण्याची किंवा रॅशेस येण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये साधारणपणे केक, चॉकलेट, आइस्क्रीम, कोल्ड्रींक, ब्रेड, बटाटा, भात यांचा समावेश होतो. 

केसांना तेल लावताना हमखास होणाऱ्या 6 चुका, तेल चोपडूनही केस होतात खराब

३. तळलेले पदार्थ 

पाऊस पडला की आपल्याला काही ना काही गरमागरम तळलेले खाण्याची इच्छा होते. मुसळधार पावसात तळलेली भजी, वडे खाण्याची मजा काही औरच. मात्र प्रमाणापेक्षा जास्त तळलेले पदार्थ खाणे त्वचेसाठी चांगले नसते. त्यामुळे पावसाळ्यात कितीही खावेसे वाटले तरी तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ ठराविक प्रमाणातच खायला हवेत. 

(Image : Google)
(Image : Google)

४. पालक 

पालकामध्ये लोह, कॅल्शियम यांसारखे घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आहारात पालकाचा समावेश आवर्जून असायला हवा असे आपण ऐकतो. पण पावसाळ्याच्या दिवसांत पालक जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्वचेवर फोड किंवा पुरळ येण्याची शक्यता असते. यामध्ये आयोडीनचे प्रमाण थोडे जास्त असल्याने असे होऊ शकते. त्यामुळे पालक आरोग्यासाठी चांगला असला तरी पावसाळ्यात तो कमी प्रमाणात खायला हवा.  

(Image : Google)
(Image : Google)

 

 

Web Title: Avoid 4 Foods in Monsoon for Skin Related Problems : 4 things not to eat in the rainy season, if eaten, pimples on the face will grow Skin care tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.