Join us  

सकाळी उठल्यावर चेहरा चमकदार दिसावा तर रात्री झोपताना अजिबात करु नका ४ चुका, दिसाल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 9:42 AM

Avoid 4 Mistakes in Night Skin Care Routine : आपला चेहरा कायम नितळ-सुंदर दिसावा यासाठी

झोप ही आपल्या जीवनशैलीतील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पूर्ण ८ ते ९ तासांची झोप मिळाली तर आपण सकाळी उठल्यावर फ्रेश आणि ताजेतवाने दिसतो. पण झोप पूर्ण झाली नसेल तर मात्र आपण आळसावलेले, ढेपाळलेले दिसतो. रात्रीच्या झोपेत आपले सगळे अवयव रिलॅक्स होतात आणि त्यांना आराम मिळतो. त्यामुळ दुसऱ्या दिवशी आपण नव्या एनर्जीने कामाला लागू शकतो. आपला चेहरा कायम नितळ-सुंदर दिसावा यासाठी आपण सतत काही ना काही प्रयत्न करत असतो (Avoid 4 Mistakes in Night Skin Care Routine).  

प्रत्येकीचे असे काही ना काही स्कीन केअर रुटीन असते. यातही मॉर्निंग स्कीन केअर रुटीन आणि नाईट स्कीन केअर रुटीन सगळ्यात महत्त्वाचे असते. रात्रीच्या वेळी आपण चेहऱ्यासाठी ज्या गोष्टी करतो त्याचा इफेक्ट आपल्याला सकाळी उठल्यावर पाहायला मिळतो. म्हणूनच रात्री झोपताना त्वचेबाबतच्या कोणत्या गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात हे समजून घेऊयात म्हणजे कोणत्या गोष्टी केलेल्या चालतील हे नकळत लक्षात येईल. 

१.  मेकअप साफ न करता झोपणे 

अनेकदा आपण ऑफीसमधून किंवा एखाद्या कार्यक्रमाहून खूप दमून घरी येतो. अशावेळी दमलेलो असल्याने आपण कपडे बदलून लगेच बेडवर आडवे होतो. मात्र आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप गडबडीत तसाच राहतो आणि त्याचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो. मात्र असे न करता कितीही उशीर झाला असेल तरी चेहरा पाण्याने किंवा क्लिंझरने स्वच्छ करायलाच हवा. 

२. स्क्रबचा वापर

रात्री झोपताना क्लिनिंग, टोनिंग, मॉईश्चरायझिंग हे सगळं आवश्यक असतं. मात्र स्क्रबिंग करणे योग्य नाही. जर स्क्रबिंग करायचंच असेल तर एखाद्या माईल्ड स्क्रबचा वापर करायला हवा. कारण रात्री झोपताना आपल्या चेहऱ्यावरची छिद्र ओपन राहीली तर त्वचेत तेलाची निर्मिती जास्त प्रमाणात होते आणि त्वचा खराब होते. 

(Image : Google)

३. फेस मास्क लावून झोपणे 

अनेकदा रात्री झोपताना चेहऱ्यावर मास्क लावला जातो. काहीवेळा जाणुनबुजून हा मास्क रात्रभर ठेवला जातो तर काही वेळा चुकून चेहऱ्यावर मास्क राहतो. मात्र यामुळे चेहऱ्याची रंध्रे बंद होत असल्याने असे करणे योग्य नाही. त्यामुळे मास्क लावायचा असेल तर दिवसा लावायला हवा.

४. मॉईश्चरायजर

ही रात्री झोपताना लावण्यासाठीची अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र बरेचदा आपण त्याकडे तेवढ्या गांभिर्याने पाहत नाही. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, ओढल्यासारखी दिसणे, रुक्ष दिसणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे झोपताना न चुकता चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावायला हवे.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमेकअप टिप्स