Join us  

चेहरा धुताना अजिबात करु नका ५ चुका, नाहीतर डाग, पिंपल्समुळे व्हाल हैराण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 4:26 PM

Avoid 5 Mistake While Washing Face : चेहरा धुताना आपल्याकडून काही चुका झाल्या तर मात्र चेहरा स्वच्छ होण्याऐवजी आणखी खराब होऊ शकतो.

आपण आंघोळ करताना, मेकअपच्या आधी, बाहेरुन आल्यावर आवर्जून चेहरा धुतो. इतकेच नाही तर खूप घाम येत असेल किंवा फ्रेश वाटत नसेल तरी आपण चेहऱ्यावर पाणी मारतो. बरेचदा आपण चेहरा धुण्यासाठी साबण किंवा फेस वॉशचा वापर करतो. चेहरा स्वच्छ दिसावा आणि राहावा यासाठी चेहरा धुणं ठिक आहे. पण चेहरा धुताना आपल्याकडून काही चुका झाल्या तर मात्र चेहरा स्वच्छ होण्याऐवजी आणखी खराब होऊ शकतो. चेहरा धुतल्याने त्यावरची डेड स्कीन, घाण निघून जाण्यास मदत होते. पण हेच तो धुताना काही चूक झाल्यास चेहऱ्यावर डाग येणे, पिंपल्स येणे अशा समस्या उद्भवतात. पाहूयात चेहरा धुताना कोणत्या ५ गोष्टी टाळायला हव्यात (Avoid 5 Mistake While Washing Face)...

१. खूप गरम पाण्याचा वापर नको 

चेहरा धुताना अगदी गार नाही पण खूप गरम पाणीही वापरु नये. शक्यतो चेहरा कोमट पाण्याने धुवायला हवा. पाणी खूप गरम असेल तर त्वचेतील रक्तवाहिन्यांना त्यामुळे इजा पोहोचण्याची शक्यता असते. 

(Image : Google)

२. चेहरा दुहेरी सफाई टाळा 

अनेकदा आपण चेहरा खूप घासून किंवा सारखा धुतो. मात्र यामुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत चेहरा स्वच्छ दिसावा यासाठी धुवू नये. 

३. ३० सेकंदांहून अधिक धुवू नका

चेहरा स्वच्छ व्हावा यासाठी आपण तो बराच वेळ घासत बसतो. त्यामुळे चेहऱ्यावर चमक येईल आणि चेहरा गोरा दिसेल असा आपला समज असतो. पण चेहरा जास्त वेळ धुतल्याने तो चांगला न दिसता आहे त्याहून खराब होण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे चेहरा जास्तीत जास्त ३० सेकंद धुवावा. 

(Image : Google)

४. कान, गळा, केस धुवू नयेत 

अनेकदा केस धुताना आपण कान, गळा किंवा केसही ओले करतो. मात्र त्यामुळे त्याठिकाणी असलेले जंतू आपल्या चेहऱ्यावर लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे चेहरा धुताना केस, कान, गळा शक्यतो धुवू नये. 

५. आपल्याला सूट होणारा फेस वॉश निवडा

प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगळा असतो. त्यामुळे आपल्या त्वचेला सूट होईल अशा फेसवॉशची निवड आपण करायला हवी. फेसवॉश चांगला नसेल किंवा आपल्याला सूट होणारा नसेल तर त्यामुळे त्वचेच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला सूट होईल अशा फेसवॉशची निवड करावी.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी