त्वचेसोबत ओठही सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते.(How to make lipstick at home with rose petals) ओठांना सुंदर बनवण्यासाठी आपण त्यावर व्हॅसलिन, दुधाची साय , तूप किंवा इतर अनेक पदार्थ लावतो. ओठांना अधिक सुंदर बनवण्यासाठी आपण त्यावर लिपस्टिक लावतो, ज्यामुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते. ( Homemade lipstick with rose petals)
लिपस्टिकमध्ये काही अंशी केमिकल्सचे प्रमाण असते ज्याचा आपल्या ओठांवर परिणाम होतो.( natural lipstick for dry lips) ज्यामुळे ओठ काळे पडणे किंवा कोरडे होणे यांसारख्या समस्या वाढतात. लिपस्टिक विकत घेताना आपण तिचा ब्रॅण्ड, शेड्स आणि इतर गोष्टींची तपासणी देखील करतो.(Chemical-free lipstick recipe) लिपस्टिक ओठांवर लावल्याने ओठांना रंग, आकार आणि आकर्षक रुप मिळते. चेहरा अधिक आकर्षक दिसावा यासाठी आपण अनेक शेड्सच्या लिपस्टिक ओठांवर ट्राय करतो. परंतु, केमिकल्सयुक्त असणाऱ्या लिपस्टिकमुळे ओठांचे सौंदर्य खराब होते. जर ओठांचे सौंदर्य जपायचे असेल, अधिक आकर्षक दिसायचे असेल तर घरीच ट्राय करा होममेड लिपस्टिक. ज्यामुळे ओठ अधिक सुंदर आणि चमकदार होतील.(Natural beauty hacks for lips)
आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..
साहित्य
गुलाबाच्या पाकळ्या - १० ते १२
गरम पाणी
नारळाचे तेल - २ ते ३ चमचे
व्हॅसलिन - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी गुलाबाच्या पाकळ्या काढून त्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टिश्यू पेपरवर ठेवून सुकवून घ्या.
2. त्यानंतर खलबत्त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ठेचून घ्या. तयार मिश्रण बाऊलमध्ये काढा.
3. आता बाऊलमध्ये नारळाचे तेल आणि व्हॅसलिन घालून एकत्र करा. गरम पाण्यात काचेचा बाऊल ठेवून पातळ मिश्रण करा.
4. चाळीने गाळून घ्या. संपलेल्या लिपस्टिकच्या डब्यात गाळलेले पाणी भरून फ्रीजमध्ये १ तास ठेवा. तयार होईल होममेड केमिकल फ्री लिपस्टिक