Lokmat Sakhi >Beauty > स्पा करायला जाताना टाळा ५ हमखास होणाऱ्या चुका, फायद्यापेक्षा ‘स्पा’चे तोटेच जास्त होतील...

स्पा करायला जाताना टाळा ५ हमखास होणाऱ्या चुका, फायद्यापेक्षा ‘स्पा’चे तोटेच जास्त होतील...

Don’t Make These 5 Mistakes At Your Next Spa Appointment : महागडी स्पा ट्रिटमेण्ट करुनही फायदा होत नाही कारण हमखास होणाऱ्या ५ चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 09:00 AM2023-07-14T09:00:20+5:302023-07-14T09:05:02+5:30

Don’t Make These 5 Mistakes At Your Next Spa Appointment : महागडी स्पा ट्रिटमेण्ट करुनही फायदा होत नाही कारण हमखास होणाऱ्या ५ चुका

Avoid These 5 Mistakes When Choosing Spa Treatment. | स्पा करायला जाताना टाळा ५ हमखास होणाऱ्या चुका, फायद्यापेक्षा ‘स्पा’चे तोटेच जास्त होतील...

स्पा करायला जाताना टाळा ५ हमखास होणाऱ्या चुका, फायद्यापेक्षा ‘स्पा’चे तोटेच जास्त होतील...

आपण रोजच्या धावपळीच्या रुटीनमधून स्वतःला व शरीराला थोडं रिलॅक्स करता यावं यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट्सचा आधार घेत असतो. आपण काहीवेळा ब्यूटी  ट्रिटमेंट्स घेतो, मसाज करून आपले थकलेले शरीर रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण स्वतःच्या शरीराला आराम देण्याचा विचार करतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे आरामदायी स्पा ट्रिटमेंट. एक आनंददायी आणि आरामदायी अनुभव स्वतःला देण्यासाठी तसेच रिफ्रेशिंग होण्याच्या उद्देशाने आपण स्पा ट्रिटमेंट्स घेतो.

स्पा करण्याची आजकाल जणू फॅशनच आली आहे. कोणत्याही महागड्या स्पा सेंटरमध्ये स्पा करुन घेण्याच्या एका सेशनची किंमत ही जवळपास दीड हजार रुपये किंवा यापेक्षा अधिक असते. एवढे पैसे खर्च केल्यानंतरही, काहीवेळा आपण या महागड्या स्पा ट्रिटमेंटचा योग्य प्रकारे आनंद घेऊ शकत नाही. काहीवेळा आपल्या काही चुकांमुळे आपण एवढ्या महागड्या स्पा ट्रिटमेंट्स करूनही त्याचा आपल्यावर काहीच उपयोग होत नाही. अशावेळी आपल्याकडून होणाऱ्या छोट्या छोट्या चुका टाळल्यास आपण या स्पा सेशनचा आनंद घेऊ शकतो(Avoid These 5 Mistakes When Choosing Spa Treatment).

स्पा सेशन दरम्यान आपल्या हातून होणाऱ्या चुका नेमक्या कोणत्या ?

चूक १ :- स्पा ट्रिटमेंट्स दरम्यान आपल्याला जे हवे ते खुलून योग्य पद्धतीने न सांगणे.

स्पा ट्रिटमेंट्स या अनेक प्रकारच्या असतात. त्यामुळे स्पा ट्रिटमेंट घेताना आपण ती ट्रिटमेंट कशासाठी, शरीराच्या कोणत्या भागांसाठी किंवा एखाद्या मुख्य अवयवांसाठी घेत आहोत हे योग्य पद्धतीने सांगणे. बहुतेक लोक त्यांच्या स्पा ट्रिटमेंट्स दरम्यान ही चूक करतात आणि संकोचामुळे ते आपले मुद्दे उघडपणे मांडू शकत नाहीत. आपल्याला कोणत्या प्रकारचे उपचार हवे आहेत, याचबरोबर उपचार हवे असलेले क्षेत्र, आपली परिस्थिती आणि ऍलर्जी याविषयी स्पष्ट स्पा प्रोफेशनल्सना सगळ्या गोष्टी सांगा. 

पस्तावाल, पश्चाताप होईल, रडाल ! प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांना काजोलचा सावधगिरीचा सल्ला...

चूक २ :- स्पा सेशनसाठी उशीरा किंवा घाई - घाई करत पोहोचणे. 

नेहमी स्पा सेशनसाठी ठरवलेल्या टाईमटेबलनुसार वेळेच्या किमान १० मिनिटे आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा. स्पा सेशन सुरु करण्याआधी वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यात आपला बराच वेळ जातो. यासाठी स्पा सेशनदरम्यान वेळेत पोहोचणे गरजेचे आहे. आपण जर स्पा सेशनसाठी उशीरा किंवा घाई - घाई करत पोहोचलात तर आपल्याला स्पा सेशनचा संपूर्णपणे आनंद घेता येणार नाही. 

शेवग्याच्या पानांचा असा करा वापर, केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय..केस होतील मजबूत व दाट...

चूक ३ :- स्पा सुविधांचा गरजेपेक्षा जास्त वापर करणे. 

स्टीम रूम आणि हॉट टब सारख्या सर्व स्पा सुविधा आपल्याला अधिक आकर्षक वाटू शकतात, परंतु आपल्याला आपल्या मर्यादा आणि आपली परिस्थिती माहित असणे आवश्यक आहे. उच्च-तापमानाच्या वातावरणात जास्त वेळ घालवल्याने निर्जलीकरण, चक्कर येणे. शुद्ध हरपणे असे अनेक त्रास होऊ शकतात. स्पा प्रोफेशनलने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आणि आपल्या शरीराला आराम आणि हायड्रेटेड होण्यासाठी स्पा सेशन दरम्यान छोटे - छोटे ब्रेक घेत राहा. 

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

चूक ४ :- गर्भधारणा किंवा इतर कोणतीही वैद्यकीय स्थिती लपवू नका. 

जर आपण गर्भवती असाल किंवा आपल्याला कोणता आजार असल्यास तसेच वैद्यकीय स्थिती ठीक नसेल तर स्पा कर्मचार्‍यांना आगाऊ सूचित करा. हे करणे आवश्यक आहे कारण अशा परिस्थितीत स्पा ट्रिटमेंट्स घेणे योग्य असेलच असे नाही. 

चूक ५ :- स्पा सेशननंतर आराम करण्यास विसरू नका. 

स्पा सेशननंतर, आराम करण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या आणि उपचारानंतरच्या प्रक्रियेमध्ये आराम करणे व पुरेशी झोप घेणे या दोन मुख्य गोष्टी आहेत.  स्पा नंतर लगेचच रोजच्या धावपळीच्या रुटीनला पुन्हा सुरुवात करु नये, असे केल्याने आपल्या शरीराला स्पाचे फायदे कमी होऊ शकतात.

Web Title: Avoid These 5 Mistakes When Choosing Spa Treatment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.