आपली त्वचा सुंदर दिसावी अशी प्रत्येकीची इच्छा असते. यासाठीच काही महिला तर दर महिन्याला पार्लरमध्ये जायचे रुटीन अतिशय काटेकोरपणे फॉलो करतात. आपल्या त्वचेची अधिक काळजी घेण्यासाठी काहीजणी फेशियल, क्लिनअप, ब्लिच, वॅक्सिंग, आयब्रो अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. फेशियल ही एक स्किन ट्रिटमेंट आहे, ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्किन प्रॉडक्ट्स वापरुन आपल्या स्किनवरील डेड स्किन काढून टाकली जाते. त्याचबरोबर एक्सफॉलिएशनद्वारे स्किन आतून स्वच्छ केली जाते. यानंतर त्वचेला फेसमास्क आणि क्रिमने हायड्रेशन केले जाते(8 Mistakes You Should Avoid to Maintain a Post Facial Glow).
त्वचेला दर अमुक काही दिवसांनी खोलवर स्वच्छ करणे आवश्यक असते. यासोबतच त्वचेला योग्य ते पोषण मिळणे देखील गरजेचे असते. फेशियल या दोन्ही गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करतात. साधारणपणे स्त्रिया महिन्यांतून एक किंवा दोन वेळा फेशियल करुन घेतात. फेशियल केल्याने आपल्या त्वचेत खूप मोठा बदल दिसून येतो. एकदा फेशियल केले की त्याचा परिणाम आपल्या स्किनवर काही काळ राहतो. परंतु फेशियल केल्यानंतर जर आपण काही चुका केल्या तर या फेशियलचा ग्लो (How to maintain a post facial glow) आपल्या स्किनवर दिसून येत नाही. यासाठीच फेशियल केल्यानंतर काही बेसिक गोष्टींची काळजी घेतली तर फेशियलचा परिणाम आणि ग्लो आपल्या त्वचेवर बराच काळ टिकून राहण्यास मदत मिळते. फेशियल केल्यानंतर त्याचे आपल्या त्वचेला दुप्पट फायदे मिळावे म्हणून नेमक्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते पाहूयात(Avoid These Common Mistakes to Achieve Glowing Skin After a Facial).
फेशियल केल्यानंतर या चुका करु नका...
१. फेशियल केल्यानंतर किमान ४ ते ६ तास फेसवॉश करु नये. फेसवॉश करायचाच असेल तर फक्त नॉर्मल पाण्यानेच चेहरा धुवून घ्यावा साबण किंवा कुठल्याही फेसवॉशचा वापर स्किनवर करु नये. याचबरोबर, फेसवॉश करताना स्किन रगडून चोळू नये फक्त हलक्या हाताने पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करून घ्यावा.
२. फेशियल केल्यानंतर किमान आठवडाभर तरी मेकअप करणे टाळावे. फेशियल केल्याने आपल्या त्वचेचे पोर्स ओपन होतात आणि अशातच मेकअप केल्याने या प्रॉडक्ट्स मधील केमिकल्स आपल्या पोर्समध्ये जाऊन अडकून बसतात. परिणामी, आपल्या त्वचेवर पुरळ किंवा पिंपल्स येऊ शकतात.
३. फेशियल केल्यानंतर लगेच उन्हांत जाऊ नका. फेशियल करुन लगेच उन्हांत गेल्यास आपली स्किन डॅमेज होऊ शकते.
४. फेशियल केल्यानंतर शक्यतो थ्रेडींग, वॅक्सिंग करणे टाळावे. फेशियल केल्यानंतर आपली त्वचा खूपच मुलायम होते अशा मुलायम त्वचेवर थ्रेडींग, वॅक्सिंग केल्याने त्वचा सोलवटून निघू शकते. याचबरोबर त्वचेला इजा होऊन जखमा होऊ शकतात.
केसातील कोंडा कमी होईल झटपट! किचनमधील १ खास पदार्थ लावा, मैत्रिणी विचारतील सिक्रेट...
५. फेशियल केल्यानंतर काही दिवस गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे. फेस स्वच्छ करण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करावा.
६. फेशियल केल्यानंतर त्वचेवर इतर प्रकारचे स्किन प्रॉडक्ट्स वापरणे टाळावे. काही दिवस कोणत्याही प्रकारचे पीलिंग मास्क आणि फेस पॅकपासून दूर राहणे फायद्याचे ठरेल.
७. फेशिअल केल्यानंतर त्वचेला सारखा स्पर्श केल्यास हातांचे इन्फेक्शन त्वचेपर्यंत पोहोचते आणि पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे फेशियल केल्यानंतर त्वचेला वारंवार स्पर्श करणे टाळा.
८. फेशियल केल्यानंतर काही दिवस एक्सरसाइज करू नका यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. एक्सरसाइज केल्याने तुमच्या शरीराचे तापमान वाढते आणि त्यामुळे घाम येतो, जो फेशियल केल्यानंतर हानिकारक ठरू शकतो.