Join us

तुम्ही चेहऱ्यावरही बॉडी लोशन लावता का? होऊ शकतं 'हे' नुकसान, लगेचच बदला सवय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:51 IST

महिला कोरडी झालेली त्वचा मऊ करण्यासाठी बॉडी लोशन वापरतात.

महिला कोरडी झालेली त्वचा मऊ करण्यासाठी बॉडी लोशन वापरतात. बॉडी लोशन त्वचेला मॉइश्चरायझ आणि हायड्रेट करण्यास मदत करतं. पण, जर तुम्ही ते चेहऱ्यावर लावलं तर ते त्वचेला नुकसान पोहोचवू शकतं. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...

चेहऱ्यावरील पोर्स बंद होऊ शकतात

चेहऱ्यावर बॉडी लोशन वापरल्याने पोर्स बंद होतात आणि त्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. बॉडी लोशनचं टेक्सचर त्वचेपेक्षा वेगळं असतं, ज्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

त्वचा कोरडी होऊ शकते

चेहऱ्यावर बॉडी लोशन वापरल्याने त्वचा कोरडी होऊ शकते . कारण ते चेहऱ्याला योग्यरित्या मॉइश्चरायझ करू शकत नाही. 

अ‍ॅलर्जीची समस्या उद्भवू शकते

चेहऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते आणि त्यामुळे बॉडी लोशन वापरल्याने ऍलर्जीची समस्या उद्भवू शकते. यासोबतच, त्यात असलेल्या केमिकल्समुळे पुरळ आणि लालसरपणासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

त्वचा चिकट होऊ शकते

बॉडी लोशनमध्ये अनेक घटक असतात आणि हे सर्व घटक चेहऱ्यासाठी पुरेसे नसतात आणि त्यामुळे चेहरा तेलकट आणि चिकट होऊ शकतो. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मुरुमांची समस्या वाढू शकते.

ही समस्या टाळण्यासाठी, चेहऱ्यावर बॉडी लोशन वापरू नका. त्याऐवजी तुम्ही तुमचा चेहरा मॉइश्चरायझ करण्यासाठी एलोव्हेरा जेल किंवा नारळाचं तेल वापरू शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्स