Lokmat Sakhi >Beauty > केसांना टक्कल पडलं-वय जास्त दिसतं? आयुर्वेदीक डॉक्टर सांगतात १ उपाय करा, भरभर वाढतील केस

केसांना टक्कल पडलं-वय जास्त दिसतं? आयुर्वेदीक डॉक्टर सांगतात १ उपाय करा, भरभर वाढतील केस

Ayurvedic Doctor Oil Recipe To Prevent Hair Fall : तेल १ महिना केसांना लावल्यानं केस गळणं कमी होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 09:47 PM2024-09-22T21:47:45+5:302024-09-22T23:00:05+5:30

Ayurvedic Doctor Oil Recipe To Prevent Hair Fall : तेल १ महिना केसांना लावल्यानं केस गळणं कमी होण्यास मदत होते.

Ayurvedic Doctor Oil Recipe To Prevent Hair Fall in One Month In 30 Days | केसांना टक्कल पडलं-वय जास्त दिसतं? आयुर्वेदीक डॉक्टर सांगतात १ उपाय करा, भरभर वाढतील केस

केसांना टक्कल पडलं-वय जास्त दिसतं? आयुर्वेदीक डॉक्टर सांगतात १ उपाय करा, भरभर वाढतील केस

केस गळणं असो किंवा केस पांढरे होणं असो या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो. (Hair Care Tips) केस काळे करण्यासाठी हेअर डाय किंवा मेहेंदीचा वापर  केला जातो तसंच हेअर फॉल रोखण्यासाठी लोक ब्रांडेड तेलांचा वापर करतात. यामुळे केस खराब होणं टाळता येतं. कारण जेव्हा आपण भरपूर गोष्टी केसांवर लावतो  तेव्हा केस खराब होण्याची शक्यता असते. (Ayurvedic Doctor Oil Recipe To Prevent Hair Fall in One Month In 30 Days)

डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी एका ग्लास तेलाबद्दल सांगितले आहे हे तेल १ महिना केसांना लावल्यानं केस गळणं कमी होण्यास मदत होते. याशिवाय केस पांढरे होत नाहीत आणि मजबूत राहतात. हे तेल बनवण्यासाठी  काही सोपे उपाय करू शकता. 

आयुर्वेदीक डॉक्टर काय सांगतात

डॉक्टर शर्मा सांगतात की तुम्ही कितीही चांगल्या तेलांचा वापर करा. जोपर्यंत केसांना आतून पोषण मिळत नाही तोपर्यंत केस गळत राहणार पण याचा अर्थ हा नाही की तुम्हाला औषधं घ्यावी लागतील. डॉ. सांगतात की आपल्या घरच्या जेवणाचे महत्व ओळखा, डॉक्टरांनी  घरच्याघरी तेल बनवण्याची सोपी युक्ती सांगितली आहे.
 केस गळती रोखण्यासाठी एक एअर टाईट कंटेनर  घ्या.

पोट कमीच होत नाही-पूर्ण शरीर बेढब झालं? नियमित २ पदार्थ पाण्यासोबत घ्या, झरझर घटेल चरबी

त्यात आवळा, नारळाचे तेल आणि तीळ घालून व्यवस्थित मिक्स करा. रोज १ चमचे तेल केसांनां लावून तुम्ही केसांचे गळणं थांबवू शकता आणि केसांना मजबूत बनवू शकता. यासाठी ३० दिवस म्हणजेच १ महिनाभर वाट पाहावी लागेल.


नारळाचे तेल फक्त  चेहरा आणि आरोग्यासाठीच चांगले नसते तर केसांसाठीही  हे तेल उत्तम असते.  यात मॉईश्चरायजिंग आणि हायड्रेटींग गुण असतात जे केस गळणं थांबवतात आणि केसांना पोषण देतात. हेअर वॉशच्या १ तास आधी हे तेल केसांना लावून मालिश करा त्यानंतर  केस धुवा.

रोज चालूनही वजन कमीच होत नाही? पाहा वयानुसार चालण्याची योग्य पद्धत कोणती-स्लिम व्हाल

आवळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी,  एंटीऑक्सिडेंट् आणि एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे केस पांढरे होण्यापासून रोखता येतं आणि केस नैसर्गिकरित्या काळे ठेवता येतात. यातील एंटीफंगल आणि एंटीबॅक्टेरिअल गुण  स्काल्प इन्फेक्शन रोखतात म्हणूनच आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करा.

Web Title: Ayurvedic Doctor Oil Recipe To Prevent Hair Fall in One Month In 30 Days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.