Join us  

ऐन तिशीतच केस पांढरे झाले? डॉक्टर सांगतात २ सोपे उपाय, डाय न करताही केस राहतील काळेभोर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 12:03 PM

Ayurvedic Home Remedy For Hair fall and Premature Gray Hair : पांढरे केस वाढू नयेत यासाठीही घरच्या घरी करता येतील असे आयुर्वेदीक उपाय

ठळक मुद्देडायमध्ये केमिकल्स असल्याने तो केसांसाठी चांगला नसतो आयुर्वेदीक उपाय केव्हाही चांगले, त्यामुळे साईड इफेक्टही होण्याची शक्यता नसते.

केस पांढरे होणे हे वय वाढल्याचे लक्षण असते. हे जरी खरे असले तरी हल्ली केस पांढरे होण्याला वयाचे बंधन राहिलेले नाही. अगदी शालेय वयातील मुलांपासून केस पांढरे व्हायला लागतात. तरुणपणात केस पांढरे झाले तर काय करायचे असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. पांढरे केस लपवण्यासाठी काही ना काही उपाय केले जातात. मात्र हे उपाय तात्पुरते असल्याने थोड्या दिवसांनी पुन्हा पांढरे केस डोकं वर काढतात. कधी मेहंदी लावण्याचा उपाय केला जातो. 

मेहेंदीमुळे केस केशरी होत असल्याने काही जण बाजारात मिळणारे केमिकलयुक्त रंग किंवा डाय करण्याचा पर्याय निवडतात. अनेकदा कमी वयात पांढरे केस इतके जास्त वाढतात की केसांना डाय करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. मात्र प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री केस गळण्याची आणि पांढरे होण्याची कारणे सांगतात. इतकेच नाही तर पांढरे केस वाढू नयेत यासाठीही घरच्या घरी करता येतील असे आयुर्वेदीक उपाय सांगतात. पाहूया घरच्या घरी करता येणारा हा उपाय कसा करायचा..

केस पांढरे होण्याची कारणे..

१. पित्तप्रकृती हे केस पांढरे होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. जास्त प्रमाणात मीठ खाणे, पॅकेट फूड, स्पायसी फूड यांमुळे पित्त वाढण्याची शक्यता असते. 

२. दूध आणि मीठाचे पदार्थ एकत्र खाणे टाळा. म्हणजेच चहासोबत आपण काही वेळा नमकीन पदार्थ खातो यामुळेही केस लवकर पांढरे होण्याची शक्यता असते. आयुर्वेदात हे विरुद्ध पदार्थ सांगितले असून यामुळे त्वचाविकार आणि केस विकार होतात. 

घरच्या घरी करता येतील असे उपाय 

१. अर्धा चमचा आवळा पावडर, अर्धा चमचा खडीसाखर आणि अर्धा चमचा गाईचे तूप एकत्र करावे. सकाळ-संध्याकाळ हे मिश्रण रीकाम्या पोटी खावे. त्याआधी आणि नंतर किमान अर्धा तास तरी काहीच खाऊ नये.  

२. आयुर्वेदातील नस्य हा अतिशय चांगला उपाय आहे. जवळच्या कोणत्याही आयुर्वेदीक डॉक्टरांकडे जाऊन हा उपाय करता येतो. तसेच घरी नियमितपणे नाकात देशी गाईचे तूप घातल्यास केस गळती, केस पांढरे होणे आणि पचनाशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीघरगुती उपाय