Lokmat Sakhi >Beauty > डोक्यात सतत कोंडा होतो, चेहराही खराब झाला? १ आयुर्वेदिक उपाय- कोंडा कायमचा निघून जाईल

डोक्यात सतत कोंडा होतो, चेहराही खराब झाला? १ आयुर्वेदिक उपाय- कोंडा कायमचा निघून जाईल

Best Remedies For Dandruff Free Scalp: सतत डोक्यात कोंडा असेल तर तो काढून टाकण्यासाठी आता हा एक आयुर्वेदिक उपाय करून पाहा... (Ayurvedic remedies for reducing dandruff)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2024 02:29 PM2024-05-20T14:29:39+5:302024-05-20T16:32:25+5:30

Best Remedies For Dandruff Free Scalp: सतत डोक्यात कोंडा असेल तर तो काढून टाकण्यासाठी आता हा एक आयुर्वेदिक उपाय करून पाहा... (Ayurvedic remedies for reducing dandruff)

Ayurvedic remedies for reducing dandruff, how to get rid of dandruff, best remedies for dandruff free scalp | डोक्यात सतत कोंडा होतो, चेहराही खराब झाला? १ आयुर्वेदिक उपाय- कोंडा कायमचा निघून जाईल

डोक्यात सतत कोंडा होतो, चेहराही खराब झाला? १ आयुर्वेदिक उपाय- कोंडा कायमचा निघून जाईल

Highlightsकोंड्याच्या त्रासाला तुम्ही वैतागला असाल तर आता हा एक रामबाण उपाय करून पाहा..

उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो... काही लोकांच्या डोक्यात वर्षभर खूपच कोंडा असतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने कोंडा होत असेल तर ते एकवेळ ठिक आहे. पण काही जणांना मात्र सतत कोंड्याचा त्रास सहन करावा लागतो. थोडी वेगळी हेअरस्टाईल केली तरी लगेचच डोक्यातला कोंडा दिसतो. यामुळे मग चारचौघांसमोर उगाच अवघडायला होतं (best remedies for dandruff free scalp). तुमचंही असंच झालं असेल आणि कोंड्याच्या त्रासाला तुम्ही वैतागला असाल तर आता हा एक रामबाण उपाय करून पाहा (how to get rid of dandruff). हा उपाय केल्याने तुमची कोंड्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल. (Ayurvedic remedies for reducing dandruff)

 

केसांतला कोंडा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय 

डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी कोणता आयुर्वेदिक उपाय करावा, याविषयीची माहिती merishrushti या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

यामध्ये असं सांगितलं आहे जर वात प्रकृतीमुळे तुमच्या डोक्यात कोंडा झाला असेल तर तो कोंडा एखाद्या पावडरप्रमाणे कोरडा दिसतो.

बारीक होण्याच्या नादात झटपट वेटलॉस करणं पडेल महागात, वाचा ICMR चे वजन घटविण्याचे सोपे नियम

जर पित्त प्रकृतीमुळे डोक्यात कोंडा झाला असेल तर तो खपल्यांच्या स्वरुपात असतो आणि त्यात थोडं मॉईश्चर किंवा थोडा तेलकटपणा असतो.

जर वात प्रकृतीमुळे कोरडा कोंडा डोक्यात वाढला असेल तर यासाठी केसांना योग्य प्रकारे तेल लावणे गरजेचे असते. आणि पित्त प्रकृतीचा कोंडा असे तर त्यासाठी तेलाचा वापर थोडा कमी करावा असा सल्ला देण्यात आला आहे.

 

तुमच्या डोक्यात वरीलपैकी कोणत्याही प्रकारचा कोंडा असला तरी तो घालविण्यासाठी एक प्रकारचा आयुर्वेदिक काढा तयार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

'या' एका कारणामुळे जपानची मुलं आहेत जगातली सगळ्यात निरोगी बालकं, मुलांचं आरोग्य जपायचं तर...

हा काढा करण्यासाठी १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये अर्धी केळी, २ टीस्पून मेथी दाणे, कडिपत्त्याची काही पानं आणि त्रिफळा पावडर टाकून काही मिनिटं उकळून घ्या. थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि ते केसांच्या मुळाशी लावा. यानंतर ४ ते ५ तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. डोक्यातला कोंडा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला असेल. 


 

Web Title: Ayurvedic remedies for reducing dandruff, how to get rid of dandruff, best remedies for dandruff free scalp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.