Lokmat Sakhi >Beauty > नेहमीच्या खोबरेल तेलात घाला फक्त २ गोष्टी, केस गळणं कायमचं थांबेल; कोंडाही गायब

नेहमीच्या खोबरेल तेलात घाला फक्त २ गोष्टी, केस गळणं कायमचं थांबेल; कोंडाही गायब

Ayurvedic Rituals with Fenugreek and Hibiscus for Healthy Hair : केस गळणं आणि केसांत कोंडा या दोन गोष्टींनी छळलंय? करा आजीच्या काळातला पारंपरिक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2024 03:27 PM2024-01-01T15:27:10+5:302024-01-01T15:27:52+5:30

Ayurvedic Rituals with Fenugreek and Hibiscus for Healthy Hair : केस गळणं आणि केसांत कोंडा या दोन गोष्टींनी छळलंय? करा आजीच्या काळातला पारंपरिक उपाय

Ayurvedic Rituals with Fenugreek and Hibiscus for Healthy Hair | नेहमीच्या खोबरेल तेलात घाला फक्त २ गोष्टी, केस गळणं कायमचं थांबेल; कोंडाही गायब

नेहमीच्या खोबरेल तेलात घाला फक्त २ गोष्टी, केस गळणं कायमचं थांबेल; कोंडाही गायब

लांब आणि दाट केस कोणाला नकोयत. केसांमुळे आपले सौंदर्य कैक पटीने वाढते. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना केसांकडे लक्ष द्यायला जमत नाही. अशा वेळी केसात कोंडा, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे यासह इतर समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात केस अधिक प्रमाणात गळतात. केस गळू नये म्हणून आपण अनेक उपाय करून पाहतो. ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन हेअर ट्रिटमेण्ट घेतो. पण पैसे न खर्च करताही आपण खोबरेल तेलाचा वापर करून केस गळतीपासून सुटका मिळवू शकता.

फक्त खोबरेल तेल लावण्यापूर्वी त्यात २ गोष्टी मिसळा, व घरगुती अँटी हेअर फॉल ऑइल तयार करा (Hair Oil for Hair Fall). या तेलामुळे केस गळती थांबेल, शिवाय केसांच्या अनेक समस्या सुटतील. कोणते २ पदार्थ तेलात मिसळावे? अँटी हेअर फॉल ऑइलमुळे केस गळती थांबेल का? पाहूयात(Ayurvedic Rituals with Fenugreek and Hibiscus for Healthy Hair).

खोबरेल तेलात मिसळा मेथी दाणे आणि जास्वंद

मेथीचे दाणे प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अनेक अँटी-ऑक्सिडंट्सचे भांडार आहे. त्यात फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड्स सारखी कंपाउंड्स असतात. जी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

पायांच्या नखांमध्ये जमा झाली बुरशी? नखं पिवळी-काळपट पडली? २ घरगुती उपाय; नखं होतील स्वच्छ

जास्वंदाची फुलं केसांसाठी फायदेशीर ठरतात. त्यात अँटीफंगल गुणधर्म असतात. जे स्काल्पवरील जीवाणू काढून टाकतात. त्यामुळे केसात खाज सुटणे, केसगळती होणे यासारख्या समस्या दूर होतात.

अँटी हेअर फॉल ऑइल तयार करण्याची कृती

एका भांड्यात आपल्या केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल घ्या. त्यात २ ते ४ चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात २ चमचे मेथी दाणे, २ जास्वंदाची फुलं घालून मिक्स करा. मध्यम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवा. काही वेळेसाठी तेल शिजण्यासाठी ठेवा. ५ ते १० मिनिटानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर गाळून एका हवाबंद डब्यात ठेवा. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून ३ वेळा करू शकता. यामुळे केसांच्या समस्या तर सुटतीलच, शिवाय केसांची नव्याने वाढ होईल.

रोज फक्त १ चमचा ‘ही’ पावडर खा, आयुष्यात कधी केस गळण्याची समस्या छळणार नाही!

केसांवर अँटी हेअर फॉल ऑइल लावण्याचे फायदे

- रात्रभर अँटी हेअर फॉल ऑइल लावल्याने केसांना आद्रता मिळते. शिवाय केसांना पुरेसे पोषण मिळते.

- जे लोकं नियमित अँटी हेअर फॉल ऑइल तेलाचा वापर करतात. त्यांचे केस लवकर पांढरे होत नाही.

- या तेलाचा वापर केल्याने केसांना अमीनो अॅसिड मिळतात जे केसांसाठी फायदेशीर ठरते.

- हे तेल टाळू स्वच्छ करण्यास आणि कोरड्या केसांना हायड्रेट करण्यास मदत करते.

Web Title: Ayurvedic Rituals with Fenugreek and Hibiscus for Healthy Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.