Join us  

पांढरे केस नैसर्गिक पद्धतीने काळे करण्याचा आयुर्वेदिक उपाय, फक्त २ पदार्थ वापरा- पांढऱ्या केसांचं टेन्शनच सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2023 1:42 PM

Best Ayurvedic Solution For White Or Gray Hair: कमी वयात खूपच जास्त केस पांढरे होऊ लागले असतील तर हा एक सोपा उपाय चटकन सुरू करा....

ठळक मुद्देहा उपाय नियमितपणे केल्यास महिना भरातच खूप चांगला परिणाम दिसून येईल. 

वय वाढल्यावर केस पांढरे होणं हे आपण समजू शकतो. पण हल्ली अगदी तरुण वयातच अनेक जणांचे केस पांढरे होत आहेत. अगदी कॉलेजमध्ये असल्यापासूनच केस पांढरे व्हायला सुरुवात होत आहे. आहारातून पुरेसं पोषणमुल्ये न मिळणं, केसांवर सतत वेगवेगळ्या केमिकल्सचा मारा होणे, प्रदुषण या सगळ्यांचा परिणाम केसांवर होतो (Ayurvedic solution for white or gray hair). त्यामुळे केस गळणं, कोंडा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस अकाली पांढरे हाेणं हा त्रास वाढू लागला आहे. म्हणूनच आता हा त्रास कमी करण्यासाठी हा एक सोपा आयुर्वेदिक उपाय करायला लवकर सुरुवात करा (Just 2 ingredients for turning your gray hair black in just 1 month)....

 

पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

हा उपाय इन्स्टाग्रामच्या dr.priyanka.abhinav_7509 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितला असून हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त २ पदार्थ लागणार आहेत.

ब्लाऊज सैल झालं- खांद्यावरुन उतरतं आहे? फक्त १ मिनिटांत करा परफेक्ट फिटिंग, बघा सोपी ट्रिक

हा उपाय केल्यामुळे जे केस काळे आहेत, ते पांढरे होणार नाहीतच, पण जे केस पांढरे आहेत ते ही काळे होऊ लागतील.

महिन्यातून ४ वेळा दर आठवड्यातून एकदा हा उपाय करावा, असे या व्हिडिओमध्ये सुचविण्यात आले आहे.

 

केस काळे हाेऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपाय

हा उपाय करण्यासाठी आपल्याला बदामाचं तेल आणि आवळ्याचा रस हे दोन पदार्थ लागणार आहेत.

बदामाचं शुद्ध तेल बाजारात मिळतं ते विकत आणावं.

गुलाबाला येतील फुलंच फुलं, रोप लावताना लक्षात ठेवा फक्त ३ गोष्टी, काही दिवसांतच येईल गुलाबाला बहर

सध्या आवळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे आवळे विकत आणावेत आणि ते किसून किंवा मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढावा. 

बदामाचं तेल आणि आवळ्याचा रस सम प्रमाणात घ्यावा आणि रात्री त्या मिश्रणाने केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करावा.

दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून टाकावेत. 

हा उपाय नियमितपणे केल्यास महिना भरातच खूप चांगला परिणाम दिसून येईल. 

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी