Lokmat Sakhi >Beauty > फक्त दिवाळीपुरतंच नाही; वर्षभर वापरा 'हे' घरगुती उटणं- पिगमेंटेशन, टॅनिंग कधीच होणार नाही

फक्त दिवाळीपुरतंच नाही; वर्षभर वापरा 'हे' घरगुती उटणं- पिगमेंटेशन, टॅनिंग कधीच होणार नाही

Ayurvedik Ubtan For Glowing Skin:दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी उटणं विकत आणणं झालं नसेल तर फक्त ४ पदार्थ वापरून घरच्याघरी अतिशय उत्तम उटणं कसं तयार करायचं ते पाहा...(how to make ubtan at home?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 08:13 PM2024-10-30T20:13:43+5:302024-10-30T20:15:17+5:30

Ayurvedik Ubtan For Glowing Skin:दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी उटणं विकत आणणं झालं नसेल तर फक्त ४ पदार्थ वापरून घरच्याघरी अतिशय उत्तम उटणं कसं तयार करायचं ते पाहा...(how to make ubtan at home?)

ayurvedik ubtan for glowing skin, how to make ubtan at home? | फक्त दिवाळीपुरतंच नाही; वर्षभर वापरा 'हे' घरगुती उटणं- पिगमेंटेशन, टॅनिंग कधीच होणार नाही

फक्त दिवाळीपुरतंच नाही; वर्षभर वापरा 'हे' घरगुती उटणं- पिगमेंटेशन, टॅनिंग कधीच होणार नाही

Highlightsतयार केलेल्या उटण्यामध्ये कच्चे दूध टाका आणि आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी तेच उटणे लावा. त्वचेचा पाेत सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

दिवाळीच्या अभ्यंगस्नानासाठी पारंपरिक उटणं हमखास लागतंच. त्याशिवाय दिवाळीचा फिल येतच नाही. उटण्याचा सुगंध आणि त्याचा स्पर्श यासमोर तुमच्या महागड्या साबण आणि फेसवॉशही फिक्या पडतात. हल्ली बाजारात कित्येक प्रकारचे वेगवेगळे उटणे मिळतात. पण सगळ्या गडबडीत उटणं आणायचं राहून गेलं असेल तर स्वयंपाक घरातले फक्त ४ पदार्थ वापरा आणि घरच्याघरी उटणे तयार करा. हे उटणे त्वचेसाठी एवढे चांगले आहे की ते तुम्ही वर्षभर नियमितपणे वापरले तरी चालेल (Ayurvedik Ubtan For Glowing Skin). यामुळे टॅनिंग, पिगमेंटेशन, डेड स्किन असा त्रास कधीच होणार नाही..(how to make ubtan at home?)

 

घरच्याघरी उटणे तयार करण्याची पद्धत

स्वयंपाक घरातले साहित्य वापरून घरच्याघरी उटणे कसे तयार करावे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Diwali Decoration: कुंड्या- रोपं वापरून घर सजविण्याच्या खास टिप्स,दिवाळीत आपलं घर दिसेल हसरं-सुंदर

यामध्ये त्यांनी तीळ, ज्येष्ठमध, बार्ली आणि अनंतमूल पावडर या ४ गोष्टी वापरायच्या आहेत. हे सगळे पदार्थ सारख्याच प्रमाणात एकत्र घ्या. त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून त्याचे उटणे तयार करा. अनंतमूल पावडर तुम्हाला तुमच्या शहरातल्या कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळेल. किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही ते मागवू शकता. ती पावडर तुम्हाला नाही मिळाली तर त्याऐवजी थोडी हळद वापरली तरी चालेल.

 

वरील पद्धतीने तयार केलेल्या उटण्यामध्ये कच्चे दूध टाका आणि आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी तेच उटणे लावा. त्वचेचा पाेत सुधारण्यास नक्कीच मदत होईल. थंडीच्या दिवसांत तिळामधली स्निग्धता तुमच्या त्वचेला छान पोषण देईल. त्यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणार नाही.

कोणत्याही ड्रेसवर- साडीवर शोभून दिसतील असे मोत्याचे कानातले! बघताक्षणीच आवडणारे ८ सुंदर डिझाईन्स

बार्लीची पावडर स्किन टोन अधिक उत्तम करण्यासाठी मदत करते. शिवाय ज्येष्ठमधामुळे त्वचेवरचे पिगमेंटेशन आणि पिंपल्स बऱ्याच प्रमाणात कमी होतात. त्वचेसाठी हे उटणे निश्चितच खूप फायदेशीर ठरणारे आहे. आठवड्यातून तीन वेळा याचा वापर करायला हरकत नाही. 


 

Web Title: ayurvedik ubtan for glowing skin, how to make ubtan at home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.