Lokmat Sakhi >Beauty > रोज विंचरताना केस भरपूर गळतात? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; महिन्याभरात दाट होतील केस

रोज विंचरताना केस भरपूर गळतात? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; महिन्याभरात दाट होतील केस

Baba Ramdev shares Home Remedies : शरीरात व्हिटामीन्सची कमतरता असणं, प्रोटीन्सची कमतरता, मिनरल्स नसणं यामुळे केस गळणं थांबत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:40 PM2024-09-20T12:40:14+5:302024-09-20T12:43:38+5:30

Baba Ramdev shares Home Remedies : शरीरात व्हिटामीन्सची कमतरता असणं, प्रोटीन्सची कमतरता, मिनरल्स नसणं यामुळे केस गळणं थांबत नाही.

Baba Ramdev shares Home Remedies To Get Thick Tresses Home Remedies To Get Thick Long Hairs | रोज विंचरताना केस भरपूर गळतात? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; महिन्याभरात दाट होतील केस

रोज विंचरताना केस भरपूर गळतात? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; महिन्याभरात दाट होतील केस

केस गळणं (Hair Fall) आणि केसांमध्ये कोंडा होणं  ही सामान्य समस्या आहे ज्यामुळे बरेच चिंतेत असतात. फक्त महिलाच नाही तर पुरूषांनाही केस गळतीच्या समस्येचा सामाना करावा लागतो. चुकीची जीवनशैली आणि नेहमीचे बदल यांमुळे केस गळती उद्भवते. (Hair Care Tips) शरीरात व्हिटामीन्सची कमतरता असणं, प्रोटीन्सची कमतरता, मिनरल्स नसणं यामुळे केस गळणं थांबत नाही. 

अनेकदा केस पांढरेसुद्धा होऊ लागतात. तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर  योगगुरू बाबा रामदेव यांनी सुचवलेले काही उपाय करून तुम्ही दाट, लांबसडक केस मिळवू शकता. (Baba Ramdev shares Home Remedies To Get Thick Tresses Home Remedies To Get Thick Long Hairs)

क्लेविन केअरच्या रिपोर्टनुसार शिकेकाईच्या वापरानं केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते, केसांची चांगली वाढ होते, केस पांढरे होत नाहीत, केस सॉफ्ट आणि शायनी होण्यास मदत होते. शिकेकाई अनेक शॅम्पू कंडिशनर्समध्ये वापरले जाते. शिकेकाई पावडर हेअर मास्कच्या स्वरूपात वापरल्यानं केसांचा कोरडेपणा दूर होतो केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिकेकाई हेअर ऑईलचा वापर केल्यानं केसांना पोषण मिळते. 

लांबसडक-दाट केस मिळवण्याचे उपाय

केसांना शिकेकाई पाडवर लावून ठेवा आणि अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा. केसांना लावण्याआधी शिकेकाई पावडर पाण्यात भिजवून ठेवा.  नंतर ही पावडर लावून केस स्वच्छ धुवा. साध्या पाण्यानं सकाळी केस धुवा.  याशिवाय आवळा, रिठा, शिकेकाई आणि पाणी रात्रभर तसंच ठेवा. सकाळी केसांना लावून त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस धुवा.

मुल्तानी माती  रात्री पाण्यात भिजवून सकाळी केस धुण्यासाठी केसांना लावा. ज्यामुळे केस चांगले राहतील.  केसांमधील कोंडा काढून टाकण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

केस धुण्याआधी नारळाचं तेल कोमट करून केसांना लावा. केसांना हे तेल लावल्यानंतर  १ तासाने केस धुवा ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतील आणि केसांची वाढ होईल. मोहोरीचे तेल आणि नारळाच्या तेलाने केसांची मसाज करा ज्यामुळे केस स्ट्राँग आणि दाट होतील.

रोज प्राणायम करा, अनुलोम-विलोम हे व्यायाम केल्यास केस हेल्दी राहण्यास मदत होईल, १ ते ५ मिनिटं शिर्षासन करा ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदे मिळतील. जर तुम्हाला शिर्षासन करायला जमत नसेल तर तुम्ही सर्वांगासन करू शकता.

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा, नसांनसांत भरेल ताकद-कंबरदुखी टळेल

५ मिनिटांसाठी तुमची नखं एकमेकांवर घासा,  दुधीचा रस आणि आवळ्याच्या रसाचे सेवन करा ज्यामुळे केसांची गुणवत्ता चांगली राहील. हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त खा, ज्यातून तुम्हाला जास्तीत जास्त पोषण मिळेल. जास्तीत जास्त पाणी प्या. 

Web Title: Baba Ramdev shares Home Remedies To Get Thick Tresses Home Remedies To Get Thick Long Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.