Lokmat Sakhi >Beauty > केस गळणं वाढलंय? रामदेव बाबा सांगतात केस वाढवण्याचा खास उपाय, केस होतील दाट

केस गळणं वाढलंय? रामदेव बाबा सांगतात केस वाढवण्याचा खास उपाय, केस होतील दाट

Baba Ramdev Simple Ways And Tips To Prevent Hair Fall : कोणी महागडा शॅम्पू विकत घेत तर कोणी हजारो रुपयांचे ट्रिटमेंट घेतं. इतकं सगळं केल्यानंतरही हेअर फॉलचा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 01:40 PM2024-08-20T13:40:47+5:302024-08-20T16:40:35+5:30

Baba Ramdev Simple Ways And Tips To Prevent Hair Fall : कोणी महागडा शॅम्पू विकत घेत तर कोणी हजारो रुपयांचे ट्रिटमेंट घेतं. इतकं सगळं केल्यानंतरही हेअर फॉलचा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतो.

Baba Ramdev Simple Ways And Tips To Prevent Hair Fall Within 7 Days | केस गळणं वाढलंय? रामदेव बाबा सांगतात केस वाढवण्याचा खास उपाय, केस होतील दाट

केस गळणं वाढलंय? रामदेव बाबा सांगतात केस वाढवण्याचा खास उपाय, केस होतील दाट

हेअर फॉल (Hair Fall)  ही अशी समस्या आहे जी जगभरातील करोडो महिलांना उद्भवते. फक्त महिलाच नाही तर पुरूष सुद्धा केस गळतीच्या त्रासाचा सामना करतात. या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी पैसे खर्च करण्यातही लोक मागे पुढे पाहत नाहीत. कोणी महागडा शॅम्पू विकत घेत तर कोणी हजारो रुपयांचे ट्रिटमेंट घेतं. इतकं सगळं केल्यानंतरही हेअर फॉलचा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतो. (Hair Care Tips)

महिलांमध्ये ही समस्या सर्वाधिक प्रमाणात उद्भवते. अनेकजण या त्रासाला कंटाळून केस कापून टाकतात. केस गळणं थांबवण्यासाठी रामदेव बाबांनी काही उपाय सांगितले आहेत. या खास टिप्स फॉलो करून तुम्ही केस गळतीच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता. (Baba Ramdev Simple Ways  And Tips To Prevent Hair Fall Within 7 Days)

योगगुरू यांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की महागडे शॅम्पू आणि कंडिशनर विकत घेऊ नका. पूर्वीच्या काळी केसांना मोहोरीचं तेल, नारळाचं तेल आणि दही लावलं जायचं आणि केस मजबूत व्हायचे. आर्टिफिशियल सुगंधित तेल न लावण्याचा सल्ला दिला दिला आहे. ज्याला विष असे म्हटले जाते. 

ओपन पोर्समुळे चेहरा खराब-डल झाला? डॉक्टर सांगतात खास उपाय, ओपन पोर्स १ दिवसात गायब

केसांचं गळणं रोखण्याचे उपाय

रामदेव बाबांनी सगळ्यात आधी ५ मिनिटं दोन्ही हातांची नखं एकमेकांना रगडायला सांगितली आहे.  रामदेव बाबांनी सांगितले हृदयाचे विकार किंवा हाय बीपीची समस्या असेल तर २ ते ५ मिनिटं शिर्षासन किंवा सर्वांगासन करा. ज्यामुळे केस चांगले राहण्यास मदत होईल.

आवळ्याचा रस, चूर्ण च्यवनप्राशचे सेवन करा. आवळ्याचे सेवन केसांसाठी फायदेशीर ठरते. दुधीचा रस आणि  आवळ्याचा रस केसांना  नियमित लावल्याने केस गळणं आवड्याभरात कमी करता येऊ शकतं. त्यांनी शॅम्पूने केस धुण्याच्या १ रात्र आधी केसांना तेल लावण्याचा सल्ला दिला आहे. 

रामदेव बाबा सांगतात की केस धुण्यासाठी तुम्ही दही किंवा आंबट ताकाचा वापर करू शकता. ज्यामुळे कोंडा, फंगस, खाजेची समस्या दूर होते. पुढे त्यांनी सांगितले की हा उपाय करण्यासाठी ताकात मुल्तानी माती, थोडं नारळाचं तेल आणि लिंबाचा रस मिसळा. ज्यामुळे केस सिल्की होतील.

केस पांढरे झालेत? ना डाय ना हेअर कलर; 3 घरगुती उपाय करा, दाट-काळे होतील केस

खाण्यापिण्याच्या संदर्भातील गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पौष्टीक आहार, हिरव्या भाज्या, फळं खाण्यास सांगितले आहे. याशिवाय जास्त तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक जास्त राग राग करतात, चिंतेत असतात त्यांचे केस जास्त गळतात. अशा स्थितीत योगाने मन शांत करण्यास मदत होते. 

Web Title: Baba Ramdev Simple Ways And Tips To Prevent Hair Fall Within 7 Days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.