गरमीच्या दिवसात अनेक स्त्रियांना त्वचेच्या संबंधीत समस्यांचा सामना करावा लागतो. त्वचेवर दाणे येणं, सनबर्न, त्वचेचा रंग पांढरा पडणं अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहेत. वाढत्या गरमीत अनेकांना पाठीवर दाणे येण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. पाठीवरच्या दाण्यांचा परिणाम झोपेवरही होतो. कोणतीही साडी घालायची किंवा लांब गळ्याचा टॉप, ड्रेस घालायचं म्हटलं तर असे डाग दिसल्यास संपूर्ण लूक बिघडतो.
अनेक महिलांना मासिक पाळी येण्याच्याआधी पाठीवर असे दाणे येतात. वेळीच घरगुती उपचार केल्यानं तुम्ही अशा समस्यांपासून लांब राहू शकता. या डागांमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. अशी समस्या उद्भवल्यास लहान मुलांचे मनोबल वाढवायला हवं. दीर्घकाळ औषधांचं सेवन करणं या डागांचे कारण असू शकते. वेळीच लक्ष दिलं नाही तर पाठीवरून कमरेपर्यंत हे दाणे वाढत जातात.
काही लोकांच्या पाठीवर दाणे येतात. हळूहळू त्यांचा आकार वाढत जतो. फिकट लाल रंगाचे असतात. अनेकदा असह्य्य वेदना होतात. हे दाणे पिकल्यानंतर न फुटता आपला डाग तसाच ठेवतात. शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे हे बदल घडून येतात. अनेकदा पोटासंबंधी समस्याही याचं कारण असू शकतं. ज्या लोकांना पोट साफ होण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागतो. पचनतंत्र व्यवस्थित नसते. त्यांना ही समस्या उद्भवते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पाठीवर दाणे येऊ नयेत यासाठी काय करता येईल याबाबत सांगणार आहोत.
पाठीवर दाणे येण्याची कारणं काय आहेत?
डॉ. पायल भोले यांनी ओन्ली माय हेल्थला दिलेल्या माहितीनुसार, बर्याच वेळा तेलकट त्वचेच्या लोकांना त्यांच्या पाठीवर पुरळ येण्याची समस्याही उद्भवू शकते. कधीकधी आपल्याला हार्मोन्समधील बदलांमुळे या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
कित्येक प्रकारची औषधे घेणे किंवा जास्त कालावधीसाठी त्यांचे सेवन केल्याने साइड इफेक्ट्स म्हणून देखील पाठीवर पुरळ होऊ शकते. पाठीवर जास्त घाम साठला तरीही पाठीवर पुरळ उठू शकते. जर आपण बराच काळ आपल्या पाठीवर पडून असाल तर त्या भागाला घामामुळे पुरळ येऊ शकते. काही प्रकरणांमध्ये ही समस्या अनुवांशिक देखील असू शकते.
उपाय
पाठीवरच्या या डागापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही उन्हाळ्याच्या आणि थंडीच्या वातावरणात मोहोरीच्या तेलानं मालिश करू शकतात. त्यासाठी सगळ्यात आधी राईचं किंवा नारळाचं तेलं घ्या. त्यानंतर यात अर्धा चमचा ओवा आणि ४ ते ५ बारिक कापलेले लसूण घाला. कमी आचेवर ५ मिनिटं ते तेल गरम करून घ्या. तुम्हाला लसूण वापारायचा नसेल तर मेथीच्या दाण्यांचा वापर करू शकता. नंतर थंड करून गाळून घ्या.
एका बाटलीत भरून रोज दिवसातून दोनवेळा या तेलानं मालिश करा. सकाळी अंघोळ करण्याआधी किंवा रात्री झोपताना या तेलानं मालिश केल्यास दाणे निघण्याची समस्या कमी होऊ शकते. प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. त्यामुळे हा उपाय करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
कीटोकोनाजोल शँम्पू (Ketoconazole Shampoo)
डॉ पायल भोळे म्हणतात की ज्या लोकांच्या त्वचेवर जास्त दाणे असतात. असे लोक काही सौंदर्य उत्पादने वापरुन त्यांना या समस्येपासून आराम मिळू शकतात. यासाठी बाजारात केटोकोनाझोल शैम्पू उपलब्ध आहे. विशेषतः बुरशीजन्य संसर्गापासून मुक्त होण्यासाठी हे शॅम्पू उपयुक्त आहे. टाळूसाठी फायदेशीर असण्याव्यतिरिक्त, पाठीवर पुरळ उठणे ही सौम्य लक्षणासाठी देखील उपयुक्त आहेत. त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्यानंतरच याचा वापर सुरू करा.
हार्मोनल थेरेपी
कधीकधी, पाठीवरील पुरळ हार्मोन्समधील बदलांमुळे उद्भवतात. म्हणूनच, इतर उपचारांचा प्रयत्न करूनही, सकारात्मक परिणाम रुग्णात दिसून येत नाही, नंतर डॉक्टर आपल्याला हार्मोनल थेरपीसाठी सल्ला देखील देऊ शकतो. तथापि, हा सल्ला काही प्रकरणांमध्येच दिला जातो. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या थेरपीचा अवलंब करु नका.
ओरल एंटी बायोटिक्स
एक्नेची समस्या जेव्हा पाठीवर वाढते तेव्हा तज्ज्ञ रुग्णांना ओरल एंटी बायोटिक्स घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे शरीरात बॅक्टेरियांचे प्रमाण कमी होते. तुमच्या पाठीचे दाणे सहज कमी होण्यास मदत होते. त्वचा आधीसारखी उजळदार आणि चांगली दिसते.
तळलेले आणि दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन करू नका
पाठीवर पुरळ उठणे यासाठीही आहार महत्वाचा आहे. मोठ्या प्रमाणात तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने आपल्याला परत पुरळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. म्हणून तळलेले पदार्थ टाळा. तसेच चॉकलेट आणि दुधाच्या उत्पादनांच्या अतिसेवनापासून दूर रहा आणि चांगला आहार घ्या जेणेकरुन तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहील आणि मुरुमांसारख्या समस्या उद्भवणार नाहीत.