Join us  

केस खूप गळाल्याने कपाळाच्या दोन्ही बाजूला टक्कल दिसतंय? १ खास उपाय, २ आठवड्यातच केस वाढतील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 5:39 PM

Natural Remedies For Fast Hair Growth: हा एक नैसर्गिक उपाय असून त्यासाठी आपल्याला ४ पदार्थ लागणार आहेत.

ठळक मुद्देहा उपाय नियमितपणे केल्यास अगदी दोन आठवड्यातच त्या ठिकाणी नवे केस उगवलेले दिसतील. 

हल्ली बऱ्याच जणांचे केस खूप गळत आहे. तरुण वयातच केस गळण्याचं प्रमाण एवढं वाढलं आहे की अगदी चाळिशीतच टक्कल पडतं की काय असं वाटतं. एक तर हेअर लाईन मागे मागे जाते आणि मग कपाळ मोठं दिसू लागतं. शिवाय कपाळाच्या दोन्ही बाजुचे केस एवढे गळतात की तिथे तर अगदी टक्कलच (baldness) दिसू लागतं. मग इकडचे तिकडचे केस पुढे आणून तो भाग झाकावा लागतो. किंवा केस गळाल्याने काही जणींचा भांग खूपच मोठा दिसू लागतो. असं काहीही तुमच्या बाबतीत झालं असेल तर हा एक नैसर्गिक उपाय करून पाहा...(Natural remedies for reducing hair loss and fast hair growth)

 

केस गळती कमी करण्यासाठी घरगुती उपाय

हा उपाय इन्स्टाग्रामच्या hairfallsolutions.in या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

दांडियासाठी इंडो- वेस्टर्न लूक करायचाय? बघा ६ हटके लूक, दिसा स्टायलिश आणि फॅशनेबल

हा उपाय करण्यासाठी आपल्याला १०० ग्रॅम रोजमेरी, १०० ग्रॅम पुदिना, ४ ते ५ टेबलस्पून किसलेलं आलं आणि २ ते ३ टेबलस्पून लवंग लागणार आहे. रोजमेरी तुमच्या शहरातल्या कोणत्याही नर्सरीमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळू शकते. 

शर्मिला टागोर म्हणतात, लग्न केलं-मुलं झाली- बिकिनीही घातली म्हणून लोकांनी नावं ठेवली पण..

यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक भांडं गरम करायला ठेवा आणि त्यात २ कप पाणी टाका.

पाणी गरम झालं की त्यात वरील सगळं साहित्य टाका आणि ८ ते १० मिनिटे पाणी चांगलं उकळून घ्या.

 

पाणी उकळून झालं की गॅस बंद करा आणि पाण्यावर झाकण ठेवून द्या.

साधारणपणे १२ ते १५ तास ते पाणी तसंच राहू द्या. त्यानंतर गाळून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

नवरात्रीत महिलांसाठी गिफ्ट घ्यायचंय? बघा १०० रुपयांत मिळणारे सुंदर पर्याय, वस्तू पाहूनच मैत्रिणी खूश होतील

रोज रात्री झोपण्यापुर्वी हे पाणी जिथले केस खूपच विरळ झाले आहेत, अशा भागावर स्प्रे करा आणि तिथे हलक्या हाताने मालिश करा. हा उपाय नियमितपणे केल्यास अगदी दोन आठवड्यातच त्या ठिकाणी नवे केस उगवलेले दिसतील. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी