ग्लोईंग त्वचेसाठी नेहमी नेहमी पार्लरला जाऊन ट्रिटमेंट करून घेणं शक्य होतंच असं नाही. रोजच्या कामाच्या गडबडीतून वेळ काढणं कठीण होतं. पण तुम्हाला माहित आहे का, रोजच्या खाण्यात जर तुम्ही काही पदार्थांचा समावेश केला तर काहीही न करता चांगली त्वचा मिळवू शकता. केळ्याच्या सेवनाचे शरीराला होणारे फायदे तुम्हाला माहितच असतील. आज आम्ही तुम्हाला केळ्याच्या सेवनानं त्वचेला, कोणते फायदे होतात याबाबत सांगणार आहोत.
त्वचेचा ग्लो वाढतो
केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळतात. मॅंगनीजचे सेवन आपल्या त्वचेत कोलेजेनचे प्रमाण वाढविण्यात मदत करते. कोलोजन हे एक आवश्यक प्रोटीन आहे, जे त्वचेच्या पेशी स्वतः तयार करते. या प्रोटीनच्या मदतीने आपली त्वचा तरूण आणि लवचिक राहील. मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये आपल्या शरीराच्या रोजच्या गरजेच्या 10 टक्के भाग्यासाठी पुरेसे पोटॅशियम असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण एका दिवसात भरपूर केळी खावी. आपल्याला फक्त 1 केळी खाण्याची गरज आहे. केळ्यांचा आकार खूपच लहान असल्यास आपण दोन केळी खाऊ शकता. पोटॅशियम आपल्या शरीरात रक्त प्रवाह वाढवण्याचे काम करते. म्हणून, केळी खाल्ल्याने, आपल्या त्वचेच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि रक्त दोन्हीचा प्रवाह योग्य राहील.
शरीर ताजंतवानं राहतं
दररोज केळी खाण्याने तुमच्या शरीरात उर्जा वाढते. ही उर्जा आपल्याला सक्रिय ठेवण्यास मदत करते. आपण सक्रिय असताना आपल्या त्वचेचा हालचाली, रक्त प्रवाह, ऊर्जा आणि ऑक्सिजनचा फायदा होतो. हे आपल्या चेहर्यावर चमक तयार करण्यात मदत होते.
त्वचा दुरूस्त होण्यास मदत होते
दररोज केळी खाल्ल्याने तुमच्या त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्याचा वेग वाढतो. कारण केळ्यामध्ये लोह, पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम तसेच इतर अनेक पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन-सी देखील समाविष्ट आहे. व्हिटॅमिन-सी तुमची त्वचा बरी करण्यास मदत करते. म्हणूनच, जेव्हा आपण दररोज केळी खाता तेव्हा आपल्या त्वचेच्या पेशी शरीरातील व्हिटॅमिन-सीचे पोषण देखील प्राप्त करतात. यामुळे आपली त्वचा त्वरीत दुरुस्त होते.
केळीच्या सालाचे त्वचेसाठी फायदे
त्वचेचा पोत सुधारतो
त्वचेचा पोत सुधारण्यासाठी केळीचे साल फायदेशीर ठरते. यासाठी केळीच्या सालीचा आतला भाग तोंडावर घासावा. घासल्यानंतर चेहेरा तसाच अर्धा तास सुकू द्यावा. नंतर अर्ध्या तासानं चेहेरा गरम पाण्यानं धुवून घ्यावा. केळीच्या सालीत अॅण्टिआॅक्सिडंटस असतात त्यामुळे त्वचा सैल न पडता घट्ट आणि बांधीव राहाते.
डोळ्याखालचा काळपटपणा कमी होतो
केळीच्या सालीचा उपयोग डोळ्याखालचा काळेपणा घालवण्यासाठी तसेच डोळ्याखालची सूज घालवण्यासाठीही करता येतो. एक चमचा घेऊन केळीच्या सालीवरचे पांढरे तंतू खरडून काढावेत. त्यात कोरफडीचा गर मिसळावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. आणि ते डोळ्याखाली लावावं. केळीच्या सालीत पोटॅशिअम असतं ते आणि कोरफड गरातील मॉश्चरायझर या दोन्हीचा उपयोग डोळ्याखालचा काळेपणा आणि सूज घालवण्यासाठी करता येतो.
डाग निघून जातात
त्वचेवर ज्या ठिकाणी डाग असतात त्या जागी केळीच्या सालीचा थोडा भाग घेऊन घासावा. घासताना केळीच्या सालीवरचे तंतू त्वचेला चिटकतात. अर्ध्या तासानं गरम पाण्यात रूमाल बुडवून घट्ट पिळून त्यानं चेहेरा पुसावा. या उपायाचा त्वरित परिणाम हवा असल्यास हा उपाय दिवसातून दोनदा करावा.