(Image Credit - Indian Beauty Solutions)
वातावरणातील बदलांमुळे आणि केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरामुळे त्वचेत नेहमीच बदल होत असतात. कधी चेहरा डल, काळपट पडतो. क्लिनअप किंवा फेशियल केल्यानंतर आठवडाभर त्याचा ग्लो चेहऱ्यावर दिसतो नंतर पुन्हा चेहरा टॅन होतो. टॅनिंग घालवण्यासाठी बाजारात बरीच उत्पादनं आहेत पण त्याचा फारसा उपयोग चेहऱ्यावर दिसून येत नाही. (Fecial Cream Hacks)
फेशियलसाठी पार्लरमध्ये ५०० ते १००० रूपये मोजावे लागतात दर आठवड्याला त्वचेवर इतका खर्च करणं अनेकांना नको वाटतं. घरच्याघरी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही फेशियल करू शकता. फळं तब्येतीप्रमाणेच त्वचेसाठीही चांगली असतात. फळांच्या साहाय्यानं त्वचा क्लिन करण्यासही मदत होते. घरच्याघरी सोप्या पद्धतीनं बनाना फेशियल कसं करायचे ते पाहूया. (How To Do Banana Facial At Home Using Natural Ingredients)
फेशियलसाठी सगळ्यात आधी एक केळी घ्या आणि साल काढून त्याची पेस्ट बनवा. तुम्ही केळी मॅश करू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. केळ्यामध्ये व्हिटामीन ए आणि सी दोन्ही असते ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. स्किन टाईट होते आणि टॅनिंग निघून जाण्यास मदत होते.
१) क्लिंजिंग आणि स्क्रबिंग
ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाऊन त्वचा मऊ, मुलायम दिसेल. यासाठी एक चमचा गुळाच्या पावडरमध्ये एक चमचा केळीची पेस्ट मिसळा आणि चेहऱ्याला व्यवस्थित स्क्रब करून घ्या. स्क्रब करत असताना जिथे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स येतात जिथे जास्त घाण साचते. हनुवटी, नाकावर फोकस करा. २ ते ३ मिनिटांसाठी हलक्या हातानं चोळा नंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवा.
२) फेशियल मसाज
एक चमचा केळीची पेस्ट, एक चमचा एलोवेरा जेल आणि स्किन कोरडी असेल तर एक छोटा चमचा बदामाचं तेल असे ३ प्रकारचे इंग्रेडिएंट्स एकत्र करा. तयार आहे मसाज क्रिम. ८ ते १० मिनिटांसाठी हलक्या हातानं चेहऱ्यावर मसाज करा. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
३) फेसपॅक
एक चमचा केळ्याच्या पेस्टमध्ये एक चमचा बेसन पावडर मिसळा. जर तुमच्या त्वचेला लिंबू सूट होत असेल तर त्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. लिंबू सूट होत नसेल तर त्यात दही मिसळा. संपूर्ण चेहऱ्याला ब्रशच्या साहाय्याने हा पॅक लावा १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवून टाका. सगळ्यात शेवटी त्वचेला मॉईश्चरायजर लावायला विसरू नका. या उपायाने त्वचेचं टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा ग्लो करेल.