Lokmat Sakhi >Beauty > घरच्याघरी १५ मिनिटांत करता येईल बनाना फेशियल! चेहऱ्यावर येईल झटपट ग्लो- दिसाल फ्रेश 

घरच्याघरी १५ मिनिटांत करता येईल बनाना फेशियल! चेहऱ्यावर येईल झटपट ग्लो- दिसाल फ्रेश 

How to Rejuvenate Skin at Home With Banana: चेहरा खूपच डल झाला असेल तर हा सोपा घरगुती उपाय करून बघा.. चेहऱ्यावर मस्त ग्लो (glowing skin) येईल... अवघ्या १५ मिनिटांतच चमकू लागेल त्वचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 01:14 PM2022-07-27T13:14:17+5:302022-07-27T13:14:53+5:30

How to Rejuvenate Skin at Home With Banana: चेहरा खूपच डल झाला असेल तर हा सोपा घरगुती उपाय करून बघा.. चेहऱ्यावर मस्त ग्लो (glowing skin) येईल... अवघ्या १५ मिनिटांतच चमकू लागेल त्वचा..

Banana facial at home within just 15 minutes, Best home remedies for glowing, soft skin | घरच्याघरी १५ मिनिटांत करता येईल बनाना फेशियल! चेहऱ्यावर येईल झटपट ग्लो- दिसाल फ्रेश 

घरच्याघरी १५ मिनिटांत करता येईल बनाना फेशियल! चेहऱ्यावर येईल झटपट ग्लो- दिसाल फ्रेश 

Highlightsअशी चमकदार त्वचा पाहून फेशियलसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरजच वाटणार नाही. 

त्वचा कधीकधी खूपच खराब (best home remedies for dull skin) दिसू लागते. चेहऱ्यावरची सगळी चमकच गेली आहे असं वाटू लागतं. साधारणपणे असं झालं की आपण पार्लरमध्ये जाऊन फेशियल (how to do facial at home) करण्याचा विचार करू लागतो. पण बऱ्याचदा तेवढाही वेळ नसतो. किंवा पार्लरच्या वेळा आणि आपल्या वेळा जुळत नाहीत. किंवा फेशियलसाठी ५००- ६०० रुपये घालविण्याची इच्छाही नसते. अशावेळी हा एक सोपा, घरगुती आणि झटपट होणारा उपाय करून बघा. बनाना फेशियल (how to do banana facial within few minutes)... यासाठी तुम्हाला फक्त ५ ते ६ रुपयांचं एखादं केळ आणि थोडासा वेळ लागणार आहे.

 

बनाना फेशियल करण्यासाठी स्टेप्स 
१. फेस क्लिनिंग

कोणतंही फेशियल करण्यापुर्वी चेहरा एकदा स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली धुळ, मळ, घाम आणि अतिरिक्त तेल निघून जातं. चेहरा स्वच्छ झाला की फेशियल अधिक चांगल्याप्रकारे करता येते. त्यामुळे तुमच्याकडचं कोणतंही सौम्य क्लिन्जर वापरून चेहरा एकदा धुवून घ्या.

 

२. बनाना स्क्रबिंग
ओपन पोअर्समधील घाण स्वच्छ करण्यासाठी तसेच डेड स्क्रिन काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणं गरजेचं आहे. यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा मिल्क पावडर, अर्धा चमचा रवा, त्यात थोडासा लिंबाचा रस आणि काही थेंब ऑलिव्ह ऑईल टाका. हे मिश्रण केळीच्या सालावर घ्या आणि त्याने चेहऱ्याला स्क्रबिंग करा. ४ ते ५ मिनिट व्यवस्थित स्क्रबिंग केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरचा काळवंडलेपणा कमी होईल.

 

३. बनाना मसाज क्रिम
स्क्रबिंग झाल्यानंतर त्वचेला मसाज करा. यासाठी एका वाटीमध्ये अर्धे केळ कुस्करून घ्या. त्यात अर्धा टेबलस्पून मध, अर्ध्या लिंबाचा रस, चुटकीभर हळद आणि एक टेबलस्पून दही टाका.

पावसाळ्यात मेकअप करताना जरा जपून... शेहनाज हुसेन यांनी दिल्या ५ खास टिप्स, मेकअप टिकेल दिवसभर

सगळे मिश्रण एकत्र करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. या क्रिमने आता ५ ते ६ मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. यामुळे चेहरा एकदम मुलायम बनेल.

 

४. बनाना फेस पॅक
बनाना मसाज क्रिमने मसाज केल्यानंतर चेहऱ्याला २ ते ३ मिनिटे वाफ द्या. त्यानंतर चेहऱ्यावर बनाना फेस पॅक लावा. फेसपॅक करण्यासाठी अर्धी केळी, त्यात लिंबाचा रस, एक टेबलस्पून मुलतानी माती आणि अर्धा चमचा दही टाका. हा पॅक चेहऱ्यावर लावा. पॅक जेव्हा सुकेल तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. अशा पद्धतीने घरच्याघरी केलेलं बनाना फेशियल तुमच्या त्वचेला अतिशय छान चमक देईल. अशी चमकदार त्वचा पाहून फेशियलसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरजच वाटणार नाही. 

 

Web Title: Banana facial at home within just 15 minutes, Best home remedies for glowing, soft skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.