Join us

केळीची साल-मीठ-हळद आणि टूथपेस्ट, दात चमकदार करण्याचा बेस्ट उपाय; एकदा करून बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:38 IST

Teeth Whitening Home Remedy : काही नॅचरल उपाय करूनही तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता. असाच एक सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे केळीची साल.

Teeth Whitening Home Remedy : आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या आजारांसोबतच तोंडाच्या अनेक समस्याही आजकाल मोठी गंभीर समस्या बनत चालल्या आहेत. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि दातांमध्ये अडकलेल्या अन्नाच्या कणांमुळे दातांवर प्लाक आणि टारटर जमा होतं. ज्यामुळे दात पिवळे दिसू लागतात. ही चारचौघात हसताना शरमेची बाब तर आहेच, सोबतच आपला आत्मविश्वासही कमी होतो. अनेक उपाय करूनही दातांवरील पिवळेपणा जात नाही. अशात काही नॅचरल उपाय करूनही तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता. असाच एक सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे केळीची साल.

दात चमकदार करण्याचा उपाय

दातांवरील पिवळेपणा घालवून दात चमकदार आणि मजबूत करायचे असतील तर अनेक घरगुती उपाय आहेत. यातीलच एक उपाय म्हणजे केळीची साल. केळीच्या सालीमध्ये काही गोष्टी मिक्स करून वापर केला तर दातांची ही समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते. यासाठी तुम्हाला केळीची साल, मीठ, हळद आणि टूथपेस्टची गरज लागेल.

कसा कराल उपाय?

दात मोत्यांसारखे चमकदार करण्यासाठी केळीच्या सालीचा पांढरा गर चमच्याच्या मदतीनं एका वाटीमध्ये काढा. त्यात थोडं मीठ, हळद आणि टूथपेस्ट मिक्स करा. नंतर हे मिश्रण दातांवर लावा आणि ब्रश करा. हा उपाय तुम्ही दिवसातून दोन वेळा करू शकता. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसून येईल.

कच्ची फळं खा

दातांना जर नॅचरली चमकदार करायचं असेल तर तुम्ही वेगवेगळी फळं जसे की, स्ट्रॉबेरी, कच्चे गाजर, काकडी, सफरचंग इत्यादी नियमितपणे खावेत. या फळांच्या मदतीनं दातांवर जमा झालेला प्लाक निघून जातो.

इतरही काही उपाय

जांभळाचं पावडर

हे तयार करण्यासाठी जांभळाच्या सालीचं पावडर तयार करा. यात थोडं सैंधव मीठ आणि काळी मिरे मिक्स करा. हे मिश्रण एका डब्यात स्टोर करा. रोज या चुर्णाने ब्रश करा. दात मजबूत तर होतीलच सोबतच पिवळेपणाही दूर होईल.

डाळिंबाचे फूल

डाळिंबाच्या फुलाचं तुम्ही चूर्ण तयार करा. हे चूर्ण एका काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करा. रोज या मंजनाने दात साफ करा. याने दातांचा पिवळेपणा दूर होईल.

लिंबू आणि तेल

लिंबाच्या रसात थोडं तेल टाका आणि त्यात थोडं मीठ मिक्स करा. या मिश्रणाने दात स्वच्छ करा. याने दात मजबूतही होतात आणि दातांचा पिवळेपणाही दूर होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्स