कोणताही ऋतू असो, काही जणींच्या बाबतीत पिंपल्सची समस्या काही त्यांची पाठ सोडत नाही. पिंपल्स (pimples) येऊन ४ ते ५ दिवस राहतात. त्यानंतर मात्र ते गेले तरी त्यांचे डाग किंवा डार्क स्पॉट्स चेहऱ्यावर पुढचा एक महिना तरी तसेच राहतात. असा पिंपल्स, डार्क स्पॉट्स (dark spots) असणारा चेहरा अजिबातच चांगला दिसत नाही. शिवाय काही जणींना डार्क सर्कल्सचा त्रासही खूपच जास्त असतो. असे तुमच्या सौंदर्यात बाधा आणणारे त्रास कमी करायचे असतील, केळीच्या सालींचा (use of banana peels) असा एक खास उपयोग करता येईल.
चेहऱ्यासाठी केळीच्या सालींचा उपयोग१. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला केळीचे साल, १ टीस्पून मध आणि १ टीस्पून ॲलोव्हेरा जेल किंवा कोरफडीचा गर लागणार आहे.
ॲसिडीटी आणि मायग्रेनचा त्रास कमी करणारा खास हर्बल टी! रोज सकाळी प्या.. ॲसिडीटी गायब
जेल आणि मध एकत्र करा. केळीच्या सालीचा आतला भाग या मिश्रणात बुडवा आणि तो गोलाकार दिशेने चेहऱ्यावर घासा. ५ ते १० मिनिटे घासल्यानंतर चेहरा धुवून टाका. हळूवार हाताने डोळ्यांच्या भोवतीही हे मिश्रण लावावे. यानंतर ५ ते ७ मिनिटे चेहरा तसाच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाका.
२. या दुसऱ्या पद्धतीनेही चेहऱ्यासाठी केळीच्या सालींचा उपयोग करता येतो. यासाठी केळीचे साल, २ टीस्पून दही, १ टीस्पून मुलतानी माती आणि २ टीस्पून गुलाब जल लागेल.
पितृपक्ष : स्वयंपाकात दहीवडे करताना लक्षात ठेवा ५ टिप्स, दहीवडे होतील मऊ लुसलुशीत
केळीचे साल वगळता इतर सगळे पदार्थ एका वाटीत एकत्र करा. केळीच्या सालांचा आतला भाग या पदार्थात बुडवा आणि तो चेहऱ्यावर गोलाकार दिशेने घासत चेहऱ्याला मसाज करा. ५ ते १० मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर त्यावर माॅईश्चरायझर लावा. हे उपाय नियमित केल्यास पिंपल्स, डार्क सर्कल्सचा त्रास तर कमी होईलच, पण चेहऱ्यावर छानसा ग्लो येईल.