केळी म्हणजे गरीबांचं सुपरफुड असं नेहमी म्हंटलं जातं. कारण केळीमध्ये एवढे गुणधर्म असतात की दररोज एक केळ नियमितपणे खाल्लं तर नक्कीच आरोग्य चांगलं राहतं आणि प्रतिकारशक्ती वाढत जाते. पचनाच्या अनेक समस्या दुर करण्याचं सामर्थ्य केळीमध्ये आहे. एकदा पचनक्रिया सुधारली की आपोआपच इतरही अनेक आजार दूर पळतात. केळ जेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे, तेवढीच चांगली त्याची सालं आहेत. चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स दूर करून त्वचा चमकविण्याचं गुपित केळीच्या सालांमध्ये दडलेलं आहे. म्हणूनच तर एकदा केळीच्या सालीचे गुणधर्म जाणून घ्या.
केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, राइबोफ्लेविन यासोबतच व्हिटॅमिन बी ६ यांसारखी अनेक जीवनसत्त्वे असतात. हेच सगळे गुणधर्म केळीच्या सालांमध्येही आहेत. त्यामुळे केळीची सालं त्वचेवर रगडा आणि अवघ्या काही दिवसांमध्येच त्वचेत होणारा बदल लक्षात घ्या.केळीच्या सालांचे उपयोग१. त्वचेची चमक वाढतेकेळीच्या सालांची आतली बाजू जी असते, ती तुमच्या त्वचेवर रगडून लावा. यामुळे त्वचेवरील चमक वाढते आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. ३ ते ४ मिनिटे केळीच्या सालांनी त्वचेवर मालिश करा आणि त्यानंतर पुढील ४ ते ५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. त्वचेला खूप फायदा होतो.
२. त्वचेचे टॅनिंग कमी होतेउन, धुळ अशा वातावरणात जर खूप वेळ काम केले तर त्वचा काळवंडते. यालाच त्वचेचे टॅनिंग होणे म्हणतात. जर त्वचेचे टॅनिंग झाले असेल, तर अशा त्वचेवर केळीची सालं चोळा. १० ते १२ मिनिटांनी डाळीचं पीठ आणि दुध हे मिश्रण लावा आणि कोमट पाण्याने त्वचा धुवून टाका. त्वचा उजळण्यास मदत होईल. केळीच्या सालांवर लिंबाचा रस पिळून ते जरी चेहऱ्यावर चोळले तरी त्वचा नितळ, चमकदार दिसू लागते.
३. पिंपल्सची समस्या कमी होतेपिंपल्सच्या स्वरूपात शरीरातील उष्णता बाहेर फेकली जाते. जर त्वचेवर फोडं येत असतील, तर केळीची सालं आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर रगडून लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल आणि पिंपल्सची समस्या कमी होईल.
४. केसांचा तेलकटपणा जाईलजर तुमचे केस सारखे तेलकट होत असतील, तर केळीची साले आणि कोरफडीचा गर हे मिश्रण एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्या आणि हा लेप केसांना लावा. यानंतर अर्ध्या तासाने केसांना शाम्पू करा. यामुळे केसांचा तेलकटपणा कमी होतो आणि केस सिल्की होण्यास मदत होते.
५. नैसर्गिक स्क्रबरजर हात, मान, पाठ किंवा पाय या भागावरची डेड स्किन काढून टाकायची असेल तर केळीच्या सालांचा उपयोग नैसर्गिक स्क्रबर म्हणून करता येतो. यासाठी केळीच्या सालांच्या आतल्या भागावर थोडी साखर टाका आणि त्यानंतर ते साल त्वचेवर चोळा. त्वचेवरच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचा उजळ, नितळ दिसू लागते. हा उपाय चेहऱ्यावर करू नये. कारण साखरेचा कडकपणा चेहऱ्याच्या मऊ त्वचेचे नुकसान करू शकतो.