Join us  

बेसनपीठाच्या पारंपरिक उपायाला नवा ट्विस्ट, वापरा बेसन क्लिंजर; ४ प्रकारच्या बेसन क्लिंजरने त्वचा होईल नितळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 2:04 PM

फेसवाॅशचे त्वचेवर होणारे साइड इफेक्ट टाळण्यासाठी आणि चेहेरा स्वच्छ करण्याचा परिणाम दीर्घकाळ टिकून त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी बेसनाचा (besan for cleansing) उपयोग करावा. त्वचा स्वच्छ करण्यासाठी, चेहेऱ्याचं सौंदर्य (besan cleansing for beautiful skin) वाढवण्यासाठी बेसनाचा क्लीन्जर म्हणून वापर करता येतो.

ठळक मुद्देबेसन क्लीन्जरनं चेहेरा धुतल्यास ऊन, धूळ, माती याचा चेहेऱ्यावर होणारा परिणाम निघून जातो.चेहेऱ्यावरील मृत पेशी निघून जातात.बेसन क्लीन्जरमुळे चेहेऱ्यावरील अतिरिक्त तेल, बारीक केस सहज निघून जातात. 

त्वचेची काळजी घेण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे चेहेरा स्वच्छ (face wash)  करणं. चेहेरा स्वच्छ करण्यासाठी साधारणत: फेसवाॅशचा वापर केला जातो. कितीही चांगल्या ब्रॅण्डच्या फेसवाॅशनं चेहेरा धुतला तरी त्याचा परिणाम थोडा काळच टिकतो आणि चेहेरा पुन्हा खराब दिसतो. बाजारात मिळणाऱ्या फेसवाॅशमध्ये रासायनिक घटक असतात. त्याचा परिणाम त्वचेच्या पोतावर होतो. त्यामुळे सारखा सारखा फेसवाॅशचा वापर त्वचेच्या आरोग्यासाठी घातक ठरतो.  फेसवाॅशचे त्वचेवर होणारे साइड इफेक्ट टाळण्यासाठी आणि चेहेरा स्वच्छ करण्याचा परिणाम दीर्घकाळ टिकून त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी बेसनाचा (besan cleansing instead of facewash) उपयोग करावा. त्वचा स्वच्छ करण्यासाठी, चेहेऱ्याचं  (besan cleansing effects on skin) सौंदर्य वाढवण्यासाठी बेसनाचा क्लीन्जर म्हणून वापर करता येतो. त्वचेच्या प्रकारानुसार बेसन क्लीन्जरचे  (besan cleanser variety as skin types) वेगवेगळे प्रकार असून त्वचेसाठी ते अतिशय फायदेशीर आहेत.

Image: Google

 

तेलकट त्वचेसाठी

जर त्वचा तेलकट असेल तर बेसनाचा क्लीन्जर म्हणून वापर करताना पुढील पध्दत वापरावी.  तेलकट त्वचेसाठीच्या बेसन क्लीन्जरसाठी 1 टमाटा, 1 चमचा गुलाब पाणी, 1 चमचा बेसन घ्यावं. एका वाटीत 1 चमचा टमाट्याचा रस, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा गुलाब पाणी घ्यावं. सर्व सामग्री एकजीव करुन घ्यावी. हे मिश्रण  चेहेऱ्यावर लावण्यासाठी आधी चेहेरा पाण्यानं धुवावा. मग बेसन क्लीन्जर चेहेरा आणि मानेस लावावं. लावताना हलक्या हातानं मसाज करावा.मसाज केल्यानंतर 5-10 मिनिटांनी चेहेरा स्वच्छ धुवावा.

Image: Google

कोरड्या त्वचेसाठी

कोरड्या त्वचेसाठी बेसन क्लीन्जर तयार करताना 1 चमचा बेसन, 1 चमचा दही आणि 1 चमचा मध घ्यावं. एका वाटीत तिन्ही गोष्टी एकत्र करुन एकजीव कराव्या. ही घट्ट पेस्ट चेहेऱ्याला लावून 15 मिनिटं ठेवावी. नंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.

Image: Google

मुरुम पुटकुळ्या असलेल्या त्वचेसाठी

चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या असतील तर अशा प्रकारचं क्लीन्जर वापरायला हवं ज्यात जिवाणुरोधक गुणधर्म असतील. अशा प्रकारचं बेसन क्लीन्जर तयार करण्यासाठी 1 चमचा बेसन, अर्धा चमचा हळद, 1 चमचा चंदन पावडर  आणि थोडं गुलाब पाणी किंवा साधं पाणी घ्यावं.  एका वाटीत सर्व जिन्नस एकत्र करुन ते गुलाब पाण्यानं किंवा साध्या पाण्यात भिजवावं. हे बेसन क्लीन्जर चेहेऱ्यास लावावं. ते पूर्ण सुकलं की चेहेरा साध्या पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

सैलसर त्वचेसाठी

त्वचा सैल पडली असल्यास फेसवाॅशचा वापर टाळायलाच हवा. यातील केमिकलमुळे त्वचेचा घट्टपणा कमी होतो. सैलसर त्वचेसाठी बेसन क्लीन्जर वापरताना 1 चमचा बेसन पीठ आणि 2 चमचे पाणी घ्यावं. एका वाटीत 1 चमचा बेसन आणि 2 चमचे बेसन पीठ घ्यावं. दोन्ही एकत्र करुन घ्यावं. मिश्रण जास्त पातळ नसावं. हे मिश्रण चेहेरा आणि मानेस लावून 10 मिनिटं ठेवून नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा.

Image: Google

बेसन क्लीन्जर वापरल्यास

1. फेसवाॅॅश ऐवजी बेसनाचा क्लीन्जर म्हणून वापर केल्यास चेहेऱ्यावरील काळपटपणा कमी होतो. ऊन आणि धूळ माती यामुळे चेहेऱ्यावर मळ साचतो, काळे डाग पडतात. ते दूर करण्यासाठी बेसन क्लीन्जर हा उत्तम उपाय आहे. 

2.  बेसनाचा क्लीन्जर म्हणून वापर केल्यास चेहेऱ्यावरील घाण आणि मृत पेशी निघून जातात. चेहेरा स्वच्छ होतो. 

3. बेसनामुळे चेहेऱ्यावरील मोठ मोठी दिसणारी रंध्रं छोटी होतात. या रंध्रात अडकलेली घाण निघून जाते. 

4. बेसन क्लीन्जरनं चेहेरा स्व्च्छ केल्यास चेहेऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जातं. चेहेऱ्यावरील बारीक केस , काळे डाग निघून जातात. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी