Join us  

चेहरा सुंदर पण मान मात्र काळवंडली आहेत? मानेवरचा काळेपणा कमी करण्यासाठी वापरा ऑरेंज पिल पॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 6:49 PM

Natural Home Remedy for Black Neck ऑरेंज पिल पॅक तयार करण्याची खास कृती, काळवंडलेली मान होईल स्वच्छ

वय वाढत गेलं की आपल्या शरीरावर देखील अनेक बदल घडतात. चेहऱ्यावर पिंपल्स उठणे, हात - पाय काळे पडणे, मान काळी पडणे अशी समस्या उद्भवत असते. अनेक वेळा दुर्लक्ष केल्याने ही समस्या वाढत जाते. माने बाबतीतही असेच घडते. मान काळी पडल्यावर वेळीच उपाय न केल्यामुळे ती अधिक काळी पडते.

मान काळी पडण्याचे अनेक कारणे असू शकतात. उन्हाने, खोटे दागिने घातल्याने मान काळी पडते. मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो. मात्र, मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते. यावर संत्र्याच्या सालीपासून पावडर उपयुक्त ठरेल. हा घरगुती उपाय नक्की करून पाहा.

संत्र्याच्या सालीपासून तयार पॅकसाठी लागणारं साहित्य

संत्र्याच्या सालीपासून तयार पावडर

दूध

लिंबू

कृती

सर्वप्रथम, एका संत्र्याच्या सालींना उन्हात सुकवून घ्या. सुकवल्यानंतर त्याची पावडर तयार करून घ्या. ही पावडर एका बाऊलमध्ये घ्या, त्यात २ चमचे दूध टाका, आणि मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर लिंबूच्या साहाय्याने काळपट पडलेल्या जागेवर लावा, आणि सोम्य हाताने घासा. मिश्रण लावल्यानंतर २० मिनिटे तसेच ठेवा. शेवटी पाण्याने धुवून घ्या. उत्तम रिझल्टसाठी ही पेस्ट आठवड्यातून २ ते ३ वेळा लावा.

या पॅकचे फायदे

हा पॅक लावल्याने त्वचेवर नवी चमक मिळते. यासह त्वचा ग्लो आणि तुकतुकीत होते.

त्वचेला टोन करण्यासाठी हा पॅक मदतगार ठरेल.

हा पॅक लावल्याने त्वचेवरील पिगमेंटेशनचे डाग, डार्क स्पॉट आणि  मुरूम निघण्यास मदत मिळते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी