Join us  

जेनेलियाच्या नाकातली सुंदर नथ! दसरा दिवाळीला हवाच असा नथीचा खास नखरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 12:05 PM

Actress Genelia D'souza's Nose Pin: अभिनेत्री जेनेलिया डिसुझाच्या नाकातली नथ (Nath) सध्या सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे. तुम्ही पाहिली का तिची ही ठसकेदार नथ?

ठळक मुद्देपिवळी झाक असणाऱ्या मोत्यांसोबतच हिरवे आणि लाल मणी लावून ती नथ जडवण्यात आली आहे.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याच्याशी लग्न करून जेनेलिया डिसुझा महाराष्ट्राची सुनबाई झाली. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये जेनेलिया हमखास मराठमोळ्या वेशभुषेत दिसून येते. महाराष्ट्रीयन पद्धतीची वेशभुषा आणि दागदागिने तिला मनापासून आवडतातही. सध्या तिचा असाच एक अस्सल मराठी लूक (Marathi look of Genelia D'souza) सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (viral photo) झाला आहे. यात जेनेलिया अतिशय सुंदर तर दिसते आहेच, तिची साडी, दागदागिने सगळे काही अतिशय मोहक आहेच, पण त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त चर्चा होते आहे ती तिच्या ठसकेबाज नथीची.

 

जेनेलियाने घातलेली ही नथ नेटिझन्सला भारीच आवडून गेली आहे. २ दिवसांपुर्वीच जेनेलियाने तिचे हे फोटो सोशल मिडियावर अपलोड केले आहेत. मोतिया- ऑफव्हाईट रंगाची साडी, हातभर बांगड्या, कानात मोठाले झुमके, केसांचा अंबाडा, कपाळावर निळ्या रंगाची तिला शोभेल अशी टिकली आणि या सगळ्यावर नथीचा साज असा सगळा तिचा एकंदरीत थाट आहे. तिच्या मोहक हास्याने तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे, यात वादच नाही. एखाद्या महिलेचा सर्वोत्तम दागिना कोणता तिचं लाजणं की नाकातली नथं... अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.

 

कशी आहे जेनेलियाची नथ?जेनेलिया डिसुझा हिने घातलेली नथ पुर्णपणे महाराष्ट्रीयन धाटणीची असून नारायण ज्वेलर्स यांनी ती डिझाईन केली आहे.

नवरात्रीसाठी लेटेस्ट ट्रेण्डी ॲक्सेसरीज घ्यायच्या आहेत? आत्ताच पाहा कमी किमतीत ५ मस्त पर्याय...

टिपिकल महाराष्ट्रीय नथीसारखाच या नथीचा आकार आहे. फक्त एका बाजूने धातूचा वापर करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूने मोती लावून ती सजवण्यात आली आहे. पिवळी झाक असणाऱ्या मोत्यांसोबतच हिरवे आणि लाल मणी लावून ती नथ जडवण्यात आली आहे.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनजेनेलिया डिसूजारितेश देशमुख