सौंदर्य समस्या (beauty problems) म्हटलं तर त्याचे उपाय हे काॅस्मेटिक्समध्येच असतात असं नाही. तर घरगुती उपायांद्वारेही (home remedy for beauty problems) त्वचा सुंदर करता येते. त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी त्वचेला काहीतरी क्रीम किंवा जेलच कशाला लावायचं? आपल्या खाण्या पिण्याच्या माध्यमातून (diet regime for beauty effects) सौंदर्य वाढवण्यासाठीचे उपाय करता येतात. मोसंबीचं सरबत (sweet lime juice benefits for skin health) हे त्वचेच्या सौंदर्यासाठी पोषक मानलं जातं. मोसंबीचं सरबत नियमित प्यायल्यास त्वचेवर जादू झाल्यासारखे परिणाम दिसतात.
Image: Google
मोसंबीच्या सरबताचे सौंदर्य फायदे
1. मोसंबीच्या रसात जीवनसत्वं आणि खनिजं असतात. त्यामुळे त्वचेसाठी मोसंबी ही फायदेशीर मानली जाते. मोसंबीत असलेलं क जीवनसत्व ॲण्टिऑक्सिड्ण्ट्स असून त्वचेवर चमक येण्यासाठी ते फायदेशीर असतं. मोसंबीच्या रसातील गुणधर्म रक्त शुध्द करतात आणि त्वचेच्या समस्या कमी करतात.
2. मोसंबीच्या रसात ब्लीचिंग आणि क्लीन्जिंग गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचा स्वच्छ करण्यासाठी, त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी मदत करतात.
3. मोसंबीचं सरबत नियमित प्यायल्यानं त्वचा तरुण दिसते. मोसंबीच्या रसात ॲण्टि एजिंग गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात. त्वचेखालील कोलॅजनची निर्मिती होण्यास चालना मिळते. यामुळे त्वचा निरोगी राहते. त्वचेवरील चमक वाढते. मोसंबीचं सरबत नियमित आहारात असल्यास त्वचेत कोलॅजनची कमतरता निर्माण होत नाही.
Image: Google
4. मोसंबीच्या रसातील गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते, विषमुक्त होते. चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या असल्यास मोसंबीचं सरबत पिणं हा फायदेशीर उपाय मानला जातो.
5. शरीरातील पाण्याची कमतरता मोसंबीचं सरबत प्यायल्यानं दूर होते. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखल्या गेल्यास त्वचा कोमेजत नाही. त्वचा कोरडी पडून सुरकुत्या पडत नाहीत. मोसंबीच्या सरबतानं त्वचा रसरशीत दिसते. मोसंबीचं सरबत प्यायल्यानंच सौदर्य फायदे मिळतात असं नाही तर ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी ओठांना मोसंबीचा रस लावल्यास फायदा होतो. तसेच ओठ फाटलेले असल्यास त्यावर उपाय म्हणूनही मोसंबीचा रस ओठांना लावता येतो. मोसंबीच्या रसानं ओठांचा कोरडेपणा कमी होवून ओठ मऊ होतात.