Lokmat Sakhi >Beauty > Beauty Break: कामाच्या रगाड्यातून बाहेर पडा फक्त 4 दिवस, करीना-कतरीनापेक्षा दिसाल फ्रेश!

Beauty Break: कामाच्या रगाड्यातून बाहेर पडा फक्त 4 दिवस, करीना-कतरीनापेक्षा दिसाल फ्रेश!

ब्युटी ट्रीटमेण्टनं चेहेर्‍यावर आणलेला उजळपणा ‘चार दिन की चांदनी’ सारखा चार दिवस टिकतो आणि निघून जातो. चेहेर्‍यासारखं मन उजळलंच जात नसल्यानं पार्लरद्वारे मिळवलेली सुंदरता, ताजेपणा तात्पुरता ठरतो. मन उजळलं की चेहेरा उजळतो आणि त्यातून मिळणारं सौंदर्य दीर्घकाळ टिकतं. हे सौंदर्य मिळवण्यासाठी म्हणूनच ब्यूटी ब्रेक आवश्यक असतो. हा ब्युटी ब्रेक असतो काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 05:23 PM2021-08-21T17:23:29+5:302021-08-23T12:55:52+5:30

ब्युटी ट्रीटमेण्टनं चेहेर्‍यावर आणलेला उजळपणा ‘चार दिन की चांदनी’ सारखा चार दिवस टिकतो आणि निघून जातो. चेहेर्‍यासारखं मन उजळलंच जात नसल्यानं पार्लरद्वारे मिळवलेली सुंदरता, ताजेपणा तात्पुरता ठरतो. मन उजळलं की चेहेरा उजळतो आणि त्यातून मिळणारं सौंदर्य दीर्घकाळ टिकतं. हे सौंदर्य मिळवण्यासाठी म्हणूनच ब्यूटी ब्रेक आवश्यक असतो. हा ब्युटी ब्रेक असतो काय?

Beauty Break: Get out of the clutter of work, just for 4 days, look fresher than Kareena-Katrina! | Beauty Break: कामाच्या रगाड्यातून बाहेर पडा फक्त 4 दिवस, करीना-कतरीनापेक्षा दिसाल फ्रेश!

Beauty Break: कामाच्या रगाड्यातून बाहेर पडा फक्त 4 दिवस, करीना-कतरीनापेक्षा दिसाल फ्रेश!

Highlightsब्युटी ब्रेक म्हणजे रोजच्या दैनंदिन आयुष्याची , रोजच्या कामाची, दगदगीची चौकट मोडून थोडे दिवस ब्रेक घ्यावा. ब्रेक घेऊन मस्त फिरुन यावं.थोडा निवांतपणा मिळवण्यासाठी घेतलेला हा ब्रेक सुंदरता देतो म्हणून याला म्हणतात ब्युटी ब्रेक.ब्युटी ब्रेक जसा सेलिब्रेटी महिलांसाठी गरजेचा असतो तसाच तो सर्वसामान्य स्त्रियांसाठीही महत्त्वाचा असतो. आपल्या बजेटनुसार, वेळेच्या उपलब्धतेनुसार अशा ब्रेकचं नियोजन करुन तो अवश्य अनुभवावा.

सध्या सोशल मीडियावर करीना कपूरचे मालदिव सहलीचे फोटो व्हयरल होत आहेत. करिनाच नाही तर कतरिना कैफ, श्रध्दा कपूर, प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी या हिंदी मराठी चित्रपट, मालिकांमधल्या अभिनेत्री मस्त सुटी काढून फिरायला जातात आणि आपल्या सहलीचे छान छान फोटो टाकतात. हे फोटो बघताना आपल्याला छान वाटते. त्याचे उजळलेले आनंदी चेहेरे बघून आपल्यालाच प्रसन्न वाटतं. पण मनात विचार येतो की, त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना अशी ऐश शक्य आहे. बस त्यानंतर आपण आपल्या ‘रोज मर्रा की जिंदगी’ च्या पाठीमागे धावतो.

घर, ऑफिस काम, मुलंबाळं, वडिलधारी मंडळी यांची काळजी यात आपलं शरीर आणि मन थकून जातं. त्याचं प्रतिबिंब मग चेहेर्‍यावर पडतं. थकलेला, रापलेल चेहेरा जेव्हा आपल्यालाच बघवणं शक्य होत नाही तेव्हा पार्लर गाठून फेशियल वगैरे करुन चेहेरा उजळून घेतला जातो. आरशात उजळलेला चेहेरा दिसण्याची सोय आहे पण मनावरचं थकल्यानं आलेलं मळभ मात्र तसंच असल्याचं दिसण्याची सोय नाही. पण ते दिसत नसलं तरी जाणवत मात्र असतं. म्हणूनच ब्युटी ट्रीटमेण्टनं आणलेला उजळपणा ‘चार दिन की चांदनी’ सारखा चार दिवस टिकतो आणि निघून जातो. चेहेर्‍यासारखं मन उजळलंच जात नसल्यानं पार्लरद्वारे मिळवलेली सुंदरता, ताजेपणा तात्पुरता ठरतो. मन उजळलं की चेहेरा उजळतो आणि त्यातून मिळणारं सौंदर्य दीर्घकाळ टिकतं. हे सौंदर्य मिळवण्यासाठी म्हणूनच ब्यूटी ब्रेक आवश्यक असतो.

छायाचित्र- गुगल

ब्युटी ब्रेक आहे काय?

 ब्युटी ब्रेक म्हणजे रोजच्या दैनंदिन आयुष्याची , रोजच्या कामाची, दगदगीची चौकट मोडून थोडे दिवस ब्रेक घ्यावा. ब्रेक घेऊन मस्त फिरुन यावं. शरीराला आणि मनाला शांत क्रावं. शांत चित्तानं स्वत:चा विचार करावा. जरा फुरसतीचे क्षण अनुभवावे . मनावरचा आणि शरीरावरच ताण काढून टाकावा. आणि परत आपल्या घरी येऊन कामाला लागावं. या छोट्याशा ब्रेकमधून मनला जो आनंद आणि उर्जा मिळते त्याचा परिणाम आपल्या दिसण्यावर होतो. बाहेरची हवा तणावमुक्त करुन अनुभवल्यानं चेहेरा उजळतो, चमकतो. मनातले नकारात्म्क विचार गळून पडतात. सकारात्मक विचार मनात येतात. त्याचा परिणाम मनावर आणि म्हणूनच चेहेर्‍यावर छान दिसायला लागतो. थोडा निवांतपणा मिळवण्यासाठी घेतलेला हा ब्रेक सुंदरता देतो म्हणून याला म्हणतात ब्युटी ब्रेक. हा ब्रेक जसा सेलिब्रेटी महिलांसाठी गरजेचा असतो तसाच तो सर्वसामान्य स्त्रियांसाठी महत्त्वाचा असतो. आपल्या बजेटनुसार, वेळेच्या उपलब्धतेनुसार अशा ब्रेकचं नियोजन करुन तो अनुंभवावा.

छायाचित्र- गुगल

हा म्हणजे ब्यूटी ब्रेक नव्हे!

अनेक महिला म्हणतील आम्ही तर दरवर्षी सहकुटुंब सहपरिवार सहलीला जातो. मात्र याला ब्युटी ब्रेक कसं म्हणावं? कारण परिवारासोबत सहलीला गेलेल्या महिला थोडा वेळ सुध्दा निवांतपणा अनुभवत नाही. सतत कोणाला काय हवं याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यात स्वत:साठी निवांत क्षण अनुभवणं राहूनच जातं. म्हणून हा ब्युटी ब्रेक नव्हे.
ब्युटी ब्रेकसाठी काय करावं?
 ब्युटी ब्रेकसाठी मस्त मैत्रिणींसोबत किमान चार दिवसांची जवळच्या जवळ ट्रीप काढून एकट्यानं फिरुन यावं. अशा मैत्रिणी नसतील तर अशी सहल करुन आणणार्‍या टूर कंपन्याही असतात. त्यांच्यासोबत जावून सुट्टी अनुभवावी. पण असा एकट्यानं, स्वत:ची सोबत करणारा ब्रेक प्रत्येकीसाठी महत्त्वाचा असतो. हा ब्रेक आपल्याला स्वत:च्या सोबतीचा, रोजच्या चक्रातून बाहेर पडल्याचा, निवांत क्षण अनुभवल्याचा आनंद तर देतोच शिवाय नजरेत भरेल अशी चेहेर्‍यावर ब्युटीही देतो.

छायाचित्र- गुगल

ब्रेक बरोबर ब्युटी हे काय गणित?

हे गणित अगदीच सोपं आहे. एकट्यानं ब्रेक घेऊन थोडे दिवस फिरुन आलं तर ताणामुळे चेहेर्‍यावर आलेला काळेपणा अर्थात टॅनिंग निघून जातं. अशा ब्रेकमुळे मनावरचा ताण निघून जातो. एरवी चेहेर्‍यावरचा काळेपणा सौंदर्य उपचारांनी जातो. पण ब्रेकमुळे मनावरचं मळभ गेल्यानं चेहेर्‍यावरचा जो काळेपणा दूर होतो त्याला खूप महत्त्व आहे.
या ब्युटी ब्रेकचा फायदा होण्यासाठी बाहेर फिरायला गेल्यावर केवळ फिरण्यातच आपली शक्ती , ऊर्जा आणि वेळ घालवू नये. तर या ब्रेकमधे आपल्याला शांत आणि पूर्ण झोप घेता येईल यालाही महत्त्व द्यावे. यामुळे आपल्या शरीरात ‘हॅपी हार्मोन्स’ स्रवायला लागतात. यामुळे डोळ्याखालची काळी वर्तुळं आपोआपच निघून जातात. म्हणूनच हा ब्रेक आहे ब्युटीसाठी खूप फायद्याचा. तेव्हा विचार करा, नियोजन करा आणि ब्रेक घ्या!

Web Title: Beauty Break: Get out of the clutter of work, just for 4 days, look fresher than Kareena-Katrina!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.