Lokmat Sakhi >Beauty > मोबाइलच्या रेडिएशनचा त्वचेवर परिणाम? मोबाईलमुळे एजिंगचा वेग वाढतो हे खरंय का?

मोबाइलच्या रेडिएशनचा त्वचेवर परिणाम? मोबाईलमुळे एजिंगचा वेग वाढतो हे खरंय का?

मोबाईलमुळे होणारा मानसिक त्रास, डोळ्यांचे आजार तर आपल्याला माहिती आहेच. पण आता तर मोबाईलच्या रेडिएशन्समुळे किंवा प्रखर उजेडामुळे त्वचेचे नुकसान होत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 02:58 PM2021-08-20T14:58:56+5:302021-08-20T15:02:38+5:30

मोबाईलमुळे होणारा मानसिक त्रास, डोळ्यांचे आजार तर आपल्याला माहिती आहेच. पण आता तर मोबाईलच्या रेडिएशन्समुळे किंवा प्रखर उजेडामुळे त्वचेचे नुकसान होत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

Beauty: Brightness of mobile starts aging process at the early age? | मोबाइलच्या रेडिएशनचा त्वचेवर परिणाम? मोबाईलमुळे एजिंगचा वेग वाढतो हे खरंय का?

मोबाइलच्या रेडिएशनचा त्वचेवर परिणाम? मोबाईलमुळे एजिंगचा वेग वाढतो हे खरंय का?

Highlightsरात्रीच्या वेळी मोबाईलचा ब्राईटनेस वाढवून माेबाईल बघणे अतिशय घातक आहे. 

मोबाईलचे उपयोग भरपूर आहेत. कदाचित त्यामुळेच आता सर्वसामान्य लोकांना मोबाईलशिवाय जगण्याची सवयच राहिलेली नाही. अनेक जण तर प्रचंड मोबाईल ॲडिक्ट झाले आहेत. मोबाईलमुळे होणारे मानसिक आजार तर आपण नेहमीच ऐकतो पण आता मोबाईलमुळे तुम्ही लवकर म्हातारे होत आहात, असे काही सौंदर्य तज्ज्ञ सांगत आहेत.

 

मोबाईल आणि म्हातारे होणे यांचा काय संबंध असा विचार मनात येणे अगदी साहजिक आहे. पण याविषयी सांगताना सुप्रसिद्ध सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसेन सांगतात की मोबाईलमधून येणारे रेडिएशन्स त्वचेसाठी अत्यंत घातक आहेत. बऱ्याच जणांना रात्रीच्या अंधारात मोबाइृल बघण्याची सवय असते. ही सवय अतिशय घातक असून त्वचेचे सगळ्यात जास्त नुकसान करणारी आहे. बहुतांश तरूण मुलांना ही सवय असते. अनेक जण तर रात्रीच्या वेळी मोबाईल आणि सोशल मिडियावर प्रचंड ॲक्टिव्ह झालेले असतात. हीच सवय त्वचेची एजिंग प्राेसेस लवकर सुरू करणारी आहे, असे काही जणांचे मत आहे.

 

मोबाईलमुळे एजिंग प्रोसेस कशी सुरू होते?
अनेक जणांना मोबाईलचा ब्राईटनेस खूप जास्त ठेवण्याची सवय असते. ब्राईटनेस कमी ठेवून मोबाईल पाहणे अनेकांना जमत नाही. या प्रखर उजेडात जेव्हा आपण मोबाईल पाहत असतो, तेव्हा आपल्याही नकळत आपण डोळे बारीक करतो आणि असे डोळे बारीक करूनच तासनतास मोबाईल पाहतो. या सगळ्याचा परिणाम आपल्या डोळ्यांभोवतीच्या त्वचेवर होतो आणि कमी वयातच मग डोळ्यांभाेवती सुरकुत्या दिसू लागतात. 

 

त्वचेवर होतो असाही परिणाम
जेव्हा आपण रात्रीच्यावेळी तासनतास मोबाईल बघत बसतो, तेव्हा आपल्याला जाणवत नसले तरी आपण मानसिक दृष्ट्या थकून जात असतो. रात्री झोपण्याच्या आधी मोबाईल पाहिल्यामुळे झोपेवर परिणाम होतो. अपूरी झोप आरोग्याच्या अनेक नव्या समस्या निर्माण करते. जेव्हा आरोग्य बिघडते, तेव्हा साहजिकच त्याचा परिणाम सगळ्यात आधी आपल्या त्वचेवर दिसून येतो. म्हणूनच रात्रीच्या वेळी मोबाईलचा ब्राईटनेस वाढवून माेबाईल बघणे अतिशय घातक आहे. 

मोबाईलमुळे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी
- रात्रीच्यावेळी मोबाईल पाहणे टाळावे
- रात्री मोबाईल बघायचाच असेल तर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बघू नये.
- रात्री मोबाईल बघताना मोबाईलचा ब्राईटनेस कमी असावा आणि खोलीतील लाईट चालू असावा.
- मोबाईल पाहतानाा डोळे बारीक करून बघू नये.

 

Web Title: Beauty: Brightness of mobile starts aging process at the early age?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.