बहुगुणी 'तुळस' ही अनेक औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाणारी वनस्पती आहे. आयुर्वेदात फार पूर्वीपासून विविध आजारांवर उपचार म्हणून तुळस फार मोठ्या प्रमाणावर वापरली जात असे. तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळेच आपल्या त्वचेसाठी तुळस तितकीच फायदेशीर ठरते. त्वचेवर येणारे पुरळ, मुरुम, काळे डाग यांसारख्या अनेक समस्यांवर तुळशीच्या पानांचा उपाय करणे हा रामबाण उपाय ठरु शकतो. आजकाल अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये तुळशीच्या पानांचा अर्क वापरला जातो. सुप्रसिद्ध ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करण्याचा सल्ला देतात(Benefits Of Tulsi For Skin & How To Apply Tulsi On Face).
तुळशीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेशी संबंधित अनेक प्रॉब्लेम्स कमी करण्यात उपयोगी ठरतात. त्वचेसाठी तुळशीच्या पानांचा वापर करायचा म्हटलं तरी तो नेमका कसा करावा हे अनेकजणींना माहित नसते. तुळशीच्या (How To Use Tulsi for Skin) पानांचा वापर करून आपण त्वचेसाठी टोनर, फेसपॅक, स्क्रब घरच्याघरीच तयार करु शकतो. यासाठीच सुप्रसिद्ध ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन (Shahnaz Husain) यांनी त्वचेसाठी तुळशीच्या वापर नेमका कोणत्या चार प्रकारे करता येऊ शकतो याबद्दल, अधिक माहिती दिली आहे. त्यामुळे यंदाच्या थंडीत फक्त रोगप्रतिकारक शक्तीच नाही तर त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील तुळशीच्या पानांचा वापर कसा करावा, ते पाहूयात(Beauty Expert Shahnaz Husain Share's 4 Ways To Use Tulsi On Face).
त्वचेसाठी तुळशीच्या पानांचा कसा वापर करावा...
१. तुळशीच्या पानांची साधी पेस्ट :- तुळशीच्या पानांमुळे आपल्या त्वचेला शीतलता मिळते. याचबरोबर, त्वचेचे रक्ताभिसरण वाढवण्यासही मदत करते. तुळशीच्या पानांच्या पेस्टचा वापर केल्यास त्वचेचा रंग उजळून येण्यासोबतच त्वचेला एक प्रकरची लकाकी येते. तुळशीच्या पानांचा रस आपण थेट त्वचेवर लावू शकता. यासाठी तुळशीची काही पाने बारीक करून त्याचा रस काढा आणि हा रस थेट त्वचेवर लावा. अर्ध्या तासानंतर पाण्याने स्वच्छ धुवा घ्या.
हिवाळ्यात टाचा फुटल्या-चालता येत नाही ? करा मेणबत्तीचा एका खास उपाय, भेगा होतील कमी...
२. तुळशीच्या पानांचा फेसपॅक :- तुळशीच्या पानांचा फेसपॅक तयार करण्यासाठी तुळशीची पाने, दही, मध, तांदूळ पीठ एकत्रित करून मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. अशाप्रकारे तुळशीच्या पानांचा फेसपॅक घरगुती फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक त्वचेवर लावा आणि १५ मिनिटे वाळल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय नियमितपणे करुन आपली त्वचा मुलायम, कोमल आणि आकर्षक बनवू शकता.
३. तुळशीच्या पानांचे टोनर :- तुळशीच्या पानांचा वापर करून आपण टोनर देखील तयार करु शकता. यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी चांगले उकळवून घ्यावे. पाणी उकळल्यानंतर त्यात तुळशीची पाने घालावीत. तुळशीच्या पानांचा अर्क जोपर्यंत या पाण्यात उतरत नाही तोपर्यंत मंद आचेवर ठेवून या पाण्याला उकळी काढून घ्यावी. पाण्याचा हलकासा रंग बदलल्यावर गॅस बंद करून हे पाणी थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. रात्री झोपताना त्वचेवर हे तुळशीच्या पानांचे टोनर स्प्रे करावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्वचेवर तुळशीच्या तेलाचाही वापर करु शकता. यामुळे त्वचेशी संबंधित विकारांशी लढण्यास मदत होते, ज्याच्या मदतीने त्वचेचे मुरुम, पुरळ इत्यादीपासून सुटका होते आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसते.
घ्या फक्त चमचाभर साजूक तूप, पायाच्या भेगा - फुटलेले ओठ- कोरडी त्वचा होईल पुन्हा मऊ, मुलायम...
४. तुळशीच्या पानांचा स्क्रब :- तुळशीच्या पानांचा स्क्रब देखील आपण घरच्याघरीच तयार करु शकतो. यासाठी सर्वप्रथम तुळशीची पाने स्वच्छ धुवून वाळवा. यानंतर, त्यांना ब्लेंडरमध्ये घालून त्यांची पातळ पेस्ट तयार करून घ्या. आता तुळशीच्या पानांची तयार पेस्ट काचेच्या बरणीत टाका आणि त्यात मध, लिंबाचा रस, साखर, मैदा आणि तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा. आता हे तयार स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा आणि १० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
अशाप्रकारे आपण चार वेगवेगळ्या पद्धतीने त्वचेसाठी तुळशीच्या पानांचा वापर करु शकता.