Join us  

उन्हामुळे चेहरा टॅन झालाय? शहनाज हुसैनच्या ५ टिप्स-चेहरा आकर्षक दिसेल, टॅनिंग दूर होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 12:47 PM

Beauty Experts Shahnaz Hussain : फेस्टिवल सिजनमध्ये आपण ग्लोईंग आणि चमकदार दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं.

सण-उत्सवांच्या सिजनमध्ये आपली त्वचा ग्लोईंग दिसावी (Beauty Tips)  अशी  प्रत्येकाची इच्छा असते. ग्लोईंग चेहरा मिळवण्यासाठी चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असतं. तरच चेहरा चमकदार आणि सुंदर दिसतो. ब्युटी एक्सपर्ट्स शहनाज हुसैन यांनी  काही स्किन केअर टिप्स शेअर केल्या आहेत. (Fecial Care Tips) फेस्टिवल सिजनमध्ये आपण ग्लोईंग आणि चमकदार दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. (Home Remedies for glowing skin) चेहरा उजळ दिसण्यासाठी तुम्ही सोप्या स्किन केअर टिप्स फॉलो करू शकता. 

चेहऱ्याला व्यवस्थित स्क्रब करा

फेस्टिव सिजनमध्ये चमकदार चेहरा मिळवण्यासाठी त्वचेला स्क्रब करणं फार महत्वाचं असतं. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचा चमकदार दिसते. फेस स्क्रब करण्यासाठी तुम्ही बदामाचा वापर करू शकता. सगळ्यात आधी स्क्रब करून घ्या त्यानंतर त्यात दही आणि पुदीना घालून मिसळा. पुदीना तुमच्या त्वचेवर शाईन आणेल-ही पेस्ट सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. (Beauty Experts Shahnaz Hussain Suggest Face Care Tips For Glowing Skin)

रात्रीच्या उरलेल्या खिचडीचा करा कुरकुरीत डोसा; झटपट बनेल नाश्ता-पाहा एकदम सोपी रेसिपी

चेहऱ्याला उटणं लावा 

दिवाळी किंवा खास प्रसंगांना चेहऱ्यावर उटणं लावलं जातं. यामुळे त्वचा चमकदार दिसतो आणि हेल्दी स्किनसाठी तुम्ही घरी बनवलेल्या उटण्याचा वापर करू शकता. चमकदार आणि हेल्दी स्किनसाठी तुम्ही घरी बनवलेल्या उटणाचा वापर करू शकता.

२० रूपयांत मिळणारे ५ केशरी पदार्थ-रोज खा; म्हातारपणातही हाडं राहतील चांगली, फिट राहाल

चमकदार आणि हेल्दी स्किनसाठी तुम्ही घरी बनवलेल्या उटणाचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल. हे उटणं बनवण्यासाठी  २ चमचे बेसनाचे पीठ, २-३ चमचा दही,  चुटकीभर मीठ घालून पेस्ट बनवा. कमीत कमी ३० मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या. सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. 

फ्रुट मास्क

फेस्टिव्हल सिजनमध्ये तुम्ही फ्रुट मास्कचा वापर करू शकता. या फ्रुट मास्कमुळे चेहरा चमकदार दिसतो. हा मास्क बनवण्यासाठी सगळ्यात आधी डाळ, दही, मध आणि गुलाबपाणी मिसळून दळून घ्या.  ही पेस्ट डोळ्यांना लागणार नाही याची काळजी घ्या.  यामुळे चेहरा ग्लोईंग आणि चमकदार दिसेल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी