Lokmat Sakhi >Beauty > दिवस रात्र केस गळतात-पातळ झाले? १० टिप्स फॉलो करा; विंचरायचा वैताग येईल इतके वाढतील केस

दिवस रात्र केस गळतात-पातळ झाले? १० टिप्स फॉलो करा; विंचरायचा वैताग येईल इतके वाढतील केस

Beauty Experts Tips On Shiny Hairs : नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केसांची हरवलेली  चमक परत येते आणि  कोंड्याची समस्याही येत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 03:47 PM2024-02-05T15:47:21+5:302024-02-05T16:08:20+5:30

Beauty Experts Tips On Shiny Hairs : नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केसांची हरवलेली  चमक परत येते आणि  कोंड्याची समस्याही येत नाही.

Beauty Experts Tips On Shiny Hairs : How to Get Long And Shine Hairs Naturally | दिवस रात्र केस गळतात-पातळ झाले? १० टिप्स फॉलो करा; विंचरायचा वैताग येईल इतके वाढतील केस

दिवस रात्र केस गळतात-पातळ झाले? १० टिप्स फॉलो करा; विंचरायचा वैताग येईल इतके वाढतील केस

चेहऱ्याप्रमाणाचे केसांवर चमक येणं फार महत्वाचे असते. (Hair Care Tips) अन्यथा अनेकदा प्रयत्न करूनही केसांचा लूक चांगला दिसत नाही. केसांवर आणि त्वचेवर चमक येण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. धूळ, माती प्रदूषणामुळे केसांची चमक कमी होते. (Beauty Tips) केसांवर केमिकल्स बेस्ड उत्पादनांचा वापर करण्याऐवजी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Beauty Experts Tips On Shiny Hairs) ब्युटी एक्सपर्ट डॉक्टर भारती तनेजा यांनी केसांना घरच्याघरी प्रोटीन ट्रिटमेंट कशी द्यावी याबाबत अधिक माहिती दिली आहे. केसांसाठी डिप मॉईश्चराईज आणि डायड्रेट ठेवणं गरजेचं असतं. (Hair Care Tips)

केसांना चमक आणण्यासाठी घरगुती उपाय (How to Grow Hairs Naturally)

1) नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केसांची हरवलेली  चमक परत येते आणि  कोंड्याची समस्याही येत नाही. आठवड्यातून  एकदा तुम्ही हा घरगुती उपाय करू शकता. ज्याचे बरेच फायदे मिळतील.

2) केसांना मध आणि गुलाबपाणी लावून मिक्स करा. हे मिश्रण स्काल्पला लावा आणि लाईट मसाज करा. मधात लिचिंग प्रोपर्टीज असतात. जास्तवेळ मध केसांना लावून ठेवा. १० ते १५ मिनिटांनी केस स्वच्छ धुवून घ्या. 

3) केसांना एलोवेरा जेल लावणं हा उत्तम उपाय आहे. एलोवेरा जेलमध्ये व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे केस चमकदार राहतात आणि कोरडेपणा दूर होतो.

4) बदामाच्या तेलात ५ थेंब टि ट्री ऑईल मिसळून केसांना लावा.  १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा. ज्यामुळे केसांना आतून पोषण मिळेल, केस डीप मॉईश्चराईज राहतील आणि डलनेस दूर होईल. हा उपाय तुम्ही केसांच्या चांगल्या वाढीसाठी करू शकता.

5) केसांना केळी लावा. त्यासाठी केळ्यात मध घाला आणि हे मिश्रण केसांच्या  लेंथवर लावा. हे एक नैसर्गिक हेअर कंडिशनर आहे. यामुळे केस चांगले राहतात आणि स्काल्पची हेल्थसुद्धा चांगली राहते.

6) आवळा पावडरमध्ये चहा पावडर मिसळून मिश्रण तयार करा हे मिश्रण रात्रभरासाठी लोखंडाच्या कढईत भिजवण्यासाठी ठेवा.   30 ते 45 मिनिटं तसंच लावलेलं राहू द्या. त्यांतर केस स्वच्छ धुवून  घ्या आठडवड्यातून 2 वेळा उपाय करा. ज्यामुळे केसांची हरवलेली चमक परत येण्यास मदत होईल.

7) केसांमध्ये दही आणि अंड मिक्स करून लावा. जर तुमचे केस ड्राय असतील तर अंड्याचा पिवळा भाग लावा. जर तुमचे केस ऑयली असतील तर अंड्याचा पांढरा भाग लावा.  या होम रेमेडीजमुळे केसांना डिप कंडिशनिंग मिळेल.

8) केसांना तुम्ही नारळाचे पाणीसुद्धा लावू शकता. यात लिंबाचा रस मिसळून लावा.  केसांच्या मुळांना आणि  लांबीला लावा. आठवड्यात 1 वेळा हा उपाय करा. ज्यामुळे केसांवर चमक येईल आणि केस हायड्रेट राहतील. 

9) जर तुमचे केस डल होत असतील तर त्यात एप्पल  सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून केसांना लावा. ज्यामुळे केसांना चमक येईल. स्काल्पही क्लिन राहील. 

10) केस शॅम्पूने वॉश केल्यानंतर चहा पावडरने पुन्हा एकदा केस स्वच्छ धुवा. त्यामुळे केसांमध्ये चमक येईल आणि केस शाईन  करतील.

Web Title: Beauty Experts Tips On Shiny Hairs : How to Get Long And Shine Hairs Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.