हाताचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण नखांना छान आकार देतो आणि त्यावर आपल्या आवडीचा छानसा नेलपेंटचा शेड लावतो. अगदी हौसेने आपण हे सगळं केलेलं असतं. नेलपेंट लावल्यामुळे आपले हात पण खूप छान दिसत असतात. पण हे सगळं एक- दोन दिवसच राहाते. कारण त्यानंतर नखांच्या कोपऱ्याकडून नेलपेंटचे टवके उडू लागतात. किंवा नेलपेंटचा शेड फिका पडू लागतो (What to do for long lasting nil paint?). असं होऊ नये आणि एकदा लावलेली नेलपेंट किमान आठवडाभर तरी जशास तशी नखावर राहावी (How to Make Nail Polish Last Longer), यासाठी हा एक सोपा उपाय करून बघा (Beauty hacks for Long lasting nail paint)...
नेलपेंट नखांवर अधिककाळ टिकण्यासाठी उपाय
नेलपेंट नखांवर अधिककाळ टिकावी म्हणून नेमका काय उपाय करावा, याविषयीचा एक छोटासा व्हिडिओ makeupp_tadka या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हिवाळ्यात त्वचा राहील मुलायम- चमकदार, तेलकट त्वचेसाठी वापरून पाहा 'हे' ३ नाईट क्रिम...
हा उपाय करण्यासाठी नेलपेंट लावण्यापुर्वी तुमच्या नखांवर एकदा कोणतीही टाल्कम पावडर लावून घ्या. टाल्कम पावडर लावल्याने नखांवरील अतिरिक्त तेल शोषले जाते.
यानंतर नखावर एकदा बेस कोट द्या. त्यानंतर तुमच्या आवडीच्या नेलपेंटचे २ ते ३ कोट लावा.
मुलांचं करिअर चांगलं व्हावं यासाठी 'ही' एकच गोष्ट करा... आर. माधवनचा पालकांसाठी खास सल्ला
यानंतर पुन्हा एकदा नखांवर बेस कोटचे कव्हर द्या आणि नेलपेंट चांगली वाळू द्या.
हा उपाय केल्यानंतर आठवडाभर तरी नेलपेंट नखांवरून निघणार नाही.
हा उपायही करून पाहा..
नेलपेंट नखांवर अधिककाळ टिकण्यासाठी व्हिनेगरचा वापरही उपयुक्त ठरतो.
यासाठी नेलपेंट लावण्यापुर्वी नखे एकदा स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर कापसाच्या बोळ्याने व्हिनेगर नखांवर लावून घ्या. व्हिनेगर नखांवर लावल्यानेही नखांवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि नेलपेंट नखांवर अधिककाळ राहण्यास मदत होते.
यानंतर बेस कोट लावून त्यानंतर तुमच्या आवडीची नेलपेंट लावा.