सुंदर, तुकतुकीत आणि चेहरा तजेलदार दिसावा यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. मुरुम, डाग, पुरळ आणि रखरखीत त्वचा आपल्या नकोशी वाटते. (Dry skin care) यासाठी आपण महागड्या पार्लरमध्ये जाऊन चेहरा अधिक सुंदर दिसावा याचा देखील प्रयत्न करत असतो. चेहऱ्यावर काही लावण्यापूर्वी आपण गुलाब पाण्याचा वापर करतो. यामुळे कोरडी त्वचा गुळगुळीत होते.(how to make your skin glow naturally at home)
बेढब चेहरा सुंदर आणि गोरापान हवा असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी गुलाब पाण्यात मिसळा व्हिटॅमिन ई. त्यामुळे चेहऱ्यावरील सगळे डाग निघून जाण्यास मदत होईल. तसेच चेहऱ्यासंबंधीत असणारे अनेक समस्यांपासून सुटका होईल. (home remedy for glowing skin overnight)
मुरुम,ओपन पोअर्स आणि ब्लॅकहेड्स होतील कमी, तुळशीच्या पानांचा ' असा ' करा उपयोग, समस्या गायब
1. गुलाब पाण्यात मिसळा व्हिटॅमिन ई चे फायदेगुलाब पाण्यात व्हिटॅमिन ई ची मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारेल. तसेच चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स निघून जाण्यास मदत होईल. तसेच त्वचेला वारंवार सुटणारी खाज आणि जळजळीपासून सुटका करेल. याच्या वापरामुळे चेहऱ्याला नॅचरल ग्लो येईल. हिवाळ्यामध्ये हा उपाय केल्याने कोरड्या आणि रुक्ष त्वचेवर चांगला परिणाम होतो. यामुळे त्वचा हायड्रेट राहाते. पिंपल्स आणि डाग कमी करण्यास मदत होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावल्याने सकाळी आपल्या चेहऱ्यावर बदल पाहायला मिळतील.
2. गुलाब पाणी - व्हिटॅमिन ई चा मसाज कसा कराल?
- सगळ्यात आधी गुलाब पाण्यात व्हिटॅमिन ई चे काही थेंब मिसळवा.
- त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहऱ्याला हळूहळू मसाज करा.
- १० ते १५ मिनिटे मालिश करा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
- नियमितपणे असे केल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होईल.
- तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, मनाने करु नका.