Lokmat Sakhi >Beauty > डाय लावायची भीती वाटते, आता केसांसाठी घरीच बनवा हर्बल डाय! त्यासाठी हव्या फक्त २ गोष्टी

डाय लावायची भीती वाटते, आता केसांसाठी घरीच बनवा हर्बल डाय! त्यासाठी हव्या फक्त २ गोष्टी

पांढरे केस लपविण्यासाठी जर वारंवार हेअर डाय वापरला तर केसांचे खूप नुकसान होते आणि केस गळायला लागतात. म्हणूनच आता घरीच केसांसाठी पोषक ठरणारा हेअर डाय तयार करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 11:46 AM2021-09-01T11:46:18+5:302021-09-01T11:53:37+5:30

पांढरे केस लपविण्यासाठी जर वारंवार हेअर डाय वापरला तर केसांचे खूप नुकसान होते आणि केस गळायला लागतात. म्हणूनच आता घरीच केसांसाठी पोषक ठरणारा हेअर डाय तयार करा.

Beauty: How to make natural hair colour, hair dye at home | डाय लावायची भीती वाटते, आता केसांसाठी घरीच बनवा हर्बल डाय! त्यासाठी हव्या फक्त २ गोष्टी

डाय लावायची भीती वाटते, आता केसांसाठी घरीच बनवा हर्बल डाय! त्यासाठी हव्या फक्त २ गोष्टी

Highlightsया हेअरडायमुळे केसांचे गळणेही मोठ्या प्रमाणात कमी होते आणि केसांची वाढ चांगली होते. 

पांढरे केस लपविण्यासाठी आजकाल हेअर डायचा उपयोग खुप सर्रास केला जातो. डाय केल्याने लगेचच पुढच्या काही दिवसात मुळाजवळचे केस पुन्हा पांढरे दिसायला लागतात. त्यामुळे मग अगदी महिन्यातून दोनदा हेअर डाय करणाऱ्याही अनेक जणी आहेत. हेअर डाय करणे ही आपली गरज आहे. पण तरीही वारंवार हेअर डाय केल्याने केसांचे प्रचंड नुकसान होते. म्हणूनच आवळा आणि शिकेकाई या दोन गोष्टींचा उपयोग करून आपल्या केसांसाठी घरीच हेअर डाय तयार करा. अगदी नैसर्गिक गोष्टींपासून हा हेअरडाय तयार केलेला असल्यामुळे केसांचे नुकसान होत नाही. उलट केसांना उत्तम पोषण मिळते. 

 

शिकेकाई आणि आवळ्याचा उपयोग
शिकेकाईने नहाणे ही आपल्याकडे खूप आधीपासून चालत आलेली परंपरा. शिकेकाई केसांसाठी अतिशय पोषक आहे. त्यामुळे शिकेकाईपासून बनविलेला हेअरडाय निश्चितच केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतो. केसांच्या आणि डोक्याच्या त्वचेच्या डिप क्लिजिंगसाठी शिकेकाई अतिशय उपयुक्त आहे. 

 

असा बनवा हेअरडाय
सगळ्यात आधी तर एका लोखंडी कढईमध्ये १ कप पाणी टाका आणि ते उकळायला ठेवा. या पाण्यात मुठभर सुकलेले आवळे टाका. त्यानंतर यामध्ये एक वाटीभर शिकेकाईचे तुकडे किंवा शिकेकाई पावडर टाका. हे सगळे मिश्रण चांगले उकळून शिजवून घ्या. ५ ते १० मिनिटे हे मिश्रण उकळले की गॅस बंद करा आणि या मिश्रणावर एक झाकण ठेवा. मिश्रण चांगले थंड होऊ द्या. त्यानंतर हे केसांना लावा आणि ४ ते ५ तासांनी केस धुवून टाका. हा नॅचरल हेअरडाय केसांसाठी अतिशय पोषक आहे. 

 

आवळ्याचे गुणधर्म
आवळा केसांसाठी अतिशय पोषक असतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आवळा खाण्यालाही तेवढेच महत्व आहे. आवळ्यामुळे केस सिल्की होतात आणि निरोगी व चमकदार बनतात. या हेअरडायमुळे केसांचे गळणेही मोठ्या प्रमाणात कमी होते आणि केसांची वाढ चांगली होते. 
 

Web Title: Beauty: How to make natural hair colour, hair dye at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.