डोळ्यांभाेवती काळी वर्तुळं येण्याची समस्या अनेकजणींना असते. स्पेशली जेव्हा आपण थ्रेडिंग करतो किंवा ज्यांना चष्मा असतो, त्या मुली जेव्हा चष्मा काढतात, तेव्हा डोळ्यांभोवतीची वर्तुळे खूपच उठून दिसतात. जेव्हा आपल्या आरोग्यात काहीतरी बिघाड झालेला असतो, तेव्हा तो डार्क सर्कल्सच्या माध्यमातून दिसून येतो. सौंदर्याच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीनेही डार्क सर्कल्सचे असणे घातकच असते. म्हणून डार्क सर्कल्स घालविण्यासाठी वेळीच काही उपाय करून पहावेत.
डार्क सर्कल्स येण्याची कारणे
- ॲनिमिया किंवा खूप जास्त अशक्तपणा
- रक्ताची आणि व्हिटॅमिन्सची कमतरता
- जंकफुड खाण्याचे वाढते प्रमाण
- अपुरी झोप, जागरण
- शारीरिक आणि मानसिक ताण
- धुम्रपान आणि मद्यपान
- उन्हात काम करावे लागणे
- किडनीचे विकार
- पचन संस्थेतले दोष
- अनुवंशिकता
- थायरॉईडच्या समस्या
- वारंवार आणि खूप रगडून डोळा चोळणे
- दृष्टीदोष
डार्कसर्कल्स कमी करण्यासाठी आहार
डार्कसर्कल्स जाण्यासाठी केवळ बाह्य उपचार करून उपयोग नाही. बाह्य उपचारांबरोबरच जर आहाराकडेही लक्ष दिले, तर डार्क सर्कल्स लवकर जातील.
१. डार्क सर्कल्स जाण्यासाठी काकडी, टोमॅटो, लिंबू, गुळ, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या, भिजवलेले बदाम, नारळपाणी, ताजी फळं यांचे नियमितपणे सेवन करणे खूप आवश्यक आहे.
२. पाणी कमी प्रमाणात प्यायल्यामुळेही डार्क सर्कल्स येतात. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी प्या. तहान लागो अथवा न लागो. दिवसात पाणी पिण्याच्या काही वेळा ठरवून घ्या आणि पाणी प्या.
३. जंकफुड आणि कोल्ड्रिंक पिण्याचे प्रमाण खूप कमी करावे. चहा- कॉफी यांचे सेवन प्रमाणात ठेवावे.
हे सौंदर्योपचार करून बघा
१. काकडी आणि टोमॅटोचा रस
काकडी आणि टोमटो यांना नैसर्गिक क्लिजिंग एजंट मानलं जातं. त्यामुळे काकडी आणि टोमॅटोचा रस एकत्र करून किंवा वेगवेगळा करून डोळ्यांखाली लावा. आठवड्यातून ३ वेळेला हा उपचार केला तरी चालतो. लवकर फरक दिसून येईल.
२. बदाम तेलाने मसाज
बदामाचे तेल त्वचेसाठी पोषक असते. रोज रात्री थोडेसे बदाम तेल घ्या आणि बोटांच्या टोकाने डोळ्यांभोवतीच्या वर्तुळांवर हलक्या हाताने मसाज करा. हा उपचार केल्यानंतर धुळीत जाणे टाळा.
३. लिंबू आणि टोमॅटो
एक टेबलस्पून टाेमॅटोचा रस घ्या. त्यामध्ये एक टिस्पून लिंबाचा रस टाका. या मिश्रणाने हलक्या हाताने डोळ्यांभोवती मसाज करा. अर्ध्या तासानंतर थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.
४. बटाट्याचा रस
बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या आणि तो काळ्या वर्तुळांभोवती लावा. यामुळे डोळ्यांखालच्या भागाचा काळेपणा लगेचच कमी होतो.
५. हर्बल टी
हर्बल टी बनवल्यानंतर टी बॅग फेकून न देता फ्रिजमध्ये ठेवा. ही बॅग थंड झाली की ती डोळ्यांवर ठेवा व डार्क सर्कल्सवरून हलक्या हाताने फिरवा. हा उपाय डार्क सर्कल्स जाण्यासाठी प्रभावी ठरतो.