Join us

काळेभोर-चमकदार-लांबसडक केसांचं सिक्रेट! महिन्यातून २ वेळा करा 'हा' सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 14:38 IST

Beauty Secret For Long And Shiny Hair: केस भराभर वाढतील आणि होतील दाट.. करून बघा हा सोपा घरगुती उपाय (best home remedy for silky and shiny hair)

ठळक मुद्देतुम्हाला केसांमध्ये खूप छान फरक दिसून येईल. तसेच केसांचं गळणंही बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं जाणवेल.

सध्या केसांच्या समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. काही जणांचे केस अजिबातच वाढत नाहीत, तर काही जणांचे केस कमी वयातच पांढरे होत आहेत. काही जणींच्या केसांना अजिबातच चमक नसते. ते एखाद्या रुक्ष झाडूप्रमाणे झालेले दिसतात. तर काही जणांचे केस खूप जास्त गळू लागतात (how to control hair fall?). केसांना पुरेसं पोषण मिळालं नाही किंवा त्यांची पुरेशी काळजी घेतली गेली नाही की मग केसांच्या अशा तक्रारी सुरू होतात. केसांच्या बाबतीत तुमच्याही अशाच समस्या असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा (beauty secret for long and shiny hair). लगेचच केसांमध्ये खूप छान फरक दिसून येईल.(best home remedy for silky and shiny hair)

 

केस चमकदार, लांबसडक व्हावेत म्हणून उपाय 

केस छान चमकदार, लांबसडक व्हावेत, यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती yashita_arora_ या इंस्टग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

वजन घटविण्यासाठी कशाला काही वेगळंच खायचं? नेहमीच्या चपात्या 'या' पद्धतीने खा; झरझर वजन उतरेल

हा उपाय करण्यासाठी पातेल्यामध्ये २ ग्लास पाणी घ्या आणि ते गॅसवर गरम करायला ठेवा. त्या पाण्यात २ चमचे जवस, २ चमचे मेथी दाणे आणि २ चमचे तांदूळ घाला. 

पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये १ चमचा कॉफी पावडर घाला. यानंतर पाणी उकळून जेव्हा ते थोडेसे दाटसर झाल्यासारखे वाटेल तेव्हा गॅस बंद करा. 

 

यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये १ चमचा ॲलोव्हेरा जेल, १ चमचा तुमचे नेहमीचे केसांना लावण्याचे तेल आणि व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल घाला. 

टोमॅटो सध्या स्वस्त आहेत! २ महिने टिकणारी चटपटीत चटणी करून ठेवा, तोंडाला मस्त चव येईल

आता सगळं व्यवस्थित हलवून घ्या आणि हे मिश्रण केसांच्या मुळाशी तसेच संपूर्ण केसांना लावा. १ तासानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. तुम्हाला केसांमध्ये खूप छान फरक दिसून येईल. तसेच केसांचं गळणंही बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं जाणवेल.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीकेसांची काळजी