Join us  

करिना कपूरचं ब्यूटी सिक्रेट! तीच सांगतेय, ग्लोईंग स्किन हवी, तर सुर्यनमस्कार घाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 7:09 PM

करिना कपूरसारखी नितळ, ग्लोईंग त्वचा हवी असेल, तर ती करते तशी मेहनत घ्यायलाच हवी... तिने स्वत:च सांगितलं आहे, तिचं ब्यूटी सिक्रेट....

ठळक मुद्देसुर्यनमस्कार हा सर्वांगिण व्यायाम असून सुर्योदयाची वेळ सुर्यनमस्कार घालण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. सुर्यनमस्कार नेहमी मोकळ्या हवेत आणि स्वच्छ सुर्यप्रकाशात घालावेत. 

करिना कपूर ही किती फिटनेस फ्रिक आहे, हे तिच्या चाहत्यांना माहितीच आहे. केवळ वेगवेगळे ब्यूटी प्रोडक्ट्स लावून साैंदर्य मिळत नाही, हे करिना तिच्या कृतीतून नेहमीच सांगत असते. जेवढे महत्त्व ती फिटनेसला देते, तेवढ्याच मेहनतीने ती डाएटिंगचे नियमही फॉलो करते. अनुवंशिकतेने तर तिला सौंदर्य आणि चमकदार त्वचा मिळालेली आहेच, पण योगा, व्यायाम, योग्य आहार यांचे पालन करून ती तिचे सौंदर्य जपते आहे. तिच्यासारखी चमकदार त्वचा पाहिजे असेल, तर तिच्यासारखी मेहनत घ्यायलाच हवी.

 

करिना कपूरने नुकतीच एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये तिने स्वत:चा एक सेल्फी शेअर केला आहे. सेल्फीमध्ये तिची त्वचा अतिशय चमकदार दिसत असून हे तेज १०८ सुर्यनमस्कार घातल्यामुळे आले आहे, असे करिना सांगते आहे. करिनाने एका दिवसात १०८ सुर्यनमस्कार घातले आहेत. अर्थातच ती नियमितपणे व्यायाम करते, त्यामुळे एका दिवसात ठराविक वेळेत १०८ सुर्यनमस्कार घालणे तिला शक्य झाले. करिना म्हणते १०८ सुर्यनमस्कार घालणे, हे एक मोठे आव्हान असून जबरदस्त इच्छाशक्ती, संयम आणि दररोज व्यायाम करण्याची सवय असेल, तरच हे ध्येय गाठता येते. 

 

एका दिवसात १०८ सुर्यनमस्कार घालणे शक्य नसले तरी दररोज १० सुर्यनमस्कार घालण्याचे उद्दिष्ट आपण स्वत:समोर नक्कीच ठेवू शकतो. सुर्यनमस्कार हा एक परिपुर्ण व्यायाम आहे. सुर्यनमस्कार घातल्यावर इतर कोणताही व्यायाम करण्याची गरज पडत नाही, हे सुर्यनमस्काराचे वैशिष्ट्य आहे. केवळ सौंदर्य वाढवायचे म्हणून नाही, तर फिट राहण्यासाठीही दररोज ठराविक सुर्यनमस्कार घालणे अतिशय गरजेचे आहे असे फिटनेस तज्ज्ञ सांगतात. 

 

सुर्यनमस्कार घालण्याचे फायदे सुर्यनमस्कार हा सर्वांगिण व्यायाम असून सुर्योदयाची वेळ सुर्यनमस्कार घालण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. सुर्यनमस्कार नेहमी मोकळ्या हवेत आणि स्वच्छ सुर्यप्रकाशात घालावेत. - नियमितपणे सुर्यनमस्कार घातल्यास अंगावरची अतिरिक्त चरबी कमी होते.- शरीर सुडौल आणि लवचिक होण्यास सुर्यनमस्कार उपयोगी ठरतात.- सुर्यनमस्कारामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते. संपूर्ण शरीरातच चांगला रक्तप्रवाह होऊ लागल्याने त्वचा तजेलदार होते.- स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी सुर्यनमस्कार हा अतिशय उत्तम व्यायाम आहे.- सुर्यनमस्कार घातल्याने श्वसन क्रिया सुधारते.- रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सुर्यनमस्कार उपयुक्त ठरतात. - लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि रक्तदाब यासारख्या आजारांसाठी सुर्यनमस्कार उपयुक्त ठरतात. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकरिना कपूरयोगफिटनेस टिप्स